असा तलाव ज्याची खोली शोधणेच एक रहस्य

1 min read

असा तलाव ज्याची खोली शोधणेच एक रहस्य

जेव्हा जेव्हा आशिया खंडात नैसर्गिक (पूर, वादळ, त्सुनामी) आपत्ती येते तेव्हा तलावाचे पाणी आपोआप वाढू लागते.

आजही जगात अशी अनेक रहस्ये आहेत, जी अद्याप एक रहस्यच राहिली आहेत, कारण शास्त्रज्ञही त्यांच्याविषयी शोधण्यात अपयशी ठरले आहेत. आज तुम्हाला अशाच एका रहस्यमय तलावाबद्दल सांगणार आहोत, जो भारतात आहे आणि असे म्हटले जाते की शास्त्रज्ञांना अद्यापपर्यंत या तलावाची खोली शोधणे शक्य झाले नाही.

या रहस्यमय कुंडाचे नाव भीम कुंड आहे, जे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यापासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर असलेल्या बाजना गावात आहे. याच्या नावावरूनच कळते की, या तलावाची कहाणी महाभारत काळाशी संबंधित आहे.

या तलावाबद्दल असे म्हणतात की महाभारत काळात जेव्हा पांडव अज्ञात होते आणि इकडे-तिकडे भटकत होते, तेव्हा त्यांना फार तहान लागली होती, परंतु कुठेही पाणी मिळाले नाही. तेव्हा भीमाने आपल्या गदाने जमिनीवर आदळत हा तलाव बनविला आणि आपली तहान शांत केली. असे म्हटले जाते की ४०-८० मीटर रूंदीचा हा तलाव बघण्यासाठी एका गदासारखेच आहे.

हा तलाव बघितल्यावर अगदी साधारण आहे असे वाटते. परंतु त्याचे वैशिष्ट्य आपल्याला आश्चर्यचकित करण्यासारखे आहे. असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा आशिया खंडात नैसर्गिक (पूर, वादळ, त्सुनामी) आपत्ती येते तेव्हा तलावाचे पाणी आपोआप वाढू लागते.

या रहस्यमय तलावाची खोली माहित करण्यासाठी स्थानिक प्रशासनापासून तर परदेशी शास्ञज्ञांनी या रहस्यमय तलावाची खोली शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. एका परदेशी शास्त्रज्ञाने या तलावाची खोली जाणून घेण्यासाठी तलावात २०० मीटर अंतरावर कॅमेरा पाठवला होता परंतु तरीसुद्धा त्यांना या तलावाच्या खोलीची पातळी लक्षात आली नाही. या तलावाचे अजून एक वैशिष्ट्य ते असे की, याचे पाणी गंगेसारखे पवित्र असून हे पाणी कधी खराबही होत नाही. एवढे असूनही मात्र एक गूढ कायम तसेच आहे की, याची खोली किती आहे आणि नैसर्गिक आपत्ती येणार असल्यावर या तलावाची पाणी पातळी कशी काय वाढते.