असा रहस्यमय प्राणी, जो ऑक्सिजनशिवाय जिवंत

1 min read

असा रहस्यमय प्राणी, जो ऑक्सिजनशिवाय जिवंत

जगातील हा असा पहिला प्राणी आहे, ज्याला जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही.

आपल्या सर्वांना हे माहित आहे की कोणताही प्राणी किंवा मनुष्य या पृथ्वीवर श्वास घेतल्याशिवाय राहू शकत नाही परंतु प्रथमच शास्त्रज्ञांना असा रहस्यमय जीव सापडला आहे, जो ऑक्सिजन शिवाय जिवंत आहे, जगातील हा एकमेव असा प्राणी असावा. इस्राईलच्या तेल-अविव्ह विद्यापीठाच्या संशोधकांच्या चमूंना हा आश्चर्यकारक आणि रहस्यमय प्राणी सापडला आहे.

संशोधकांच्या मते, हे प्राणी माश्यांपासून ऊर्जा मिळवतात. या दरम्यान ते माश्यांना कोणतेही नुकसान करत नाही. विशेष म्हणजे मासे देखील या प्राण्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान करत नाहीत. हे परजीवी साल्मन फिशमध्ये आढळतात आणि मासे जिवंत आहेत तोपर्यंतच ते जगतात.

हेनिग्युया साल्मिनिकोला असे या जीवाचे वैज्ञानिक नाव आहे. संशोधन प्रमुख डायना याहलोमी यांनी सांगितले की, हा प्राणी मानवांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी देखील हानिकारक नाही. माञ आत्तापर्यंत हे रहस्य उलघडलेले नाही की, पृथ्वीवर अशा प्रकारचे प्राणी कसे विकसित झाले जे ऑक्सिजनशिवाय जगू शकतात.

फ्लूरोसेंस मायक्रोस्कोपच्या सहाय्याने वैज्ञानिकांनी हा प्राणी पाहिला, ज्यामध्ये त्यांना मायटोकोन्ड्रियल डीएनए दिसला नाही. यानंतर हे समजले की जगातील हा असा पहिला प्राणी आहे, ज्याला जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही. २०१० मध्ये इटलीमधील संशोधकांना एक असाच प्राणी  सापडला होता ज्याचे उर्जा स्त्रोत हायड्रोजन सल्फाइड होते. परंतु नव्याने सापडलेल्या या प्राण्याला हायड्रोजन सल्फाइडची देखील आवश्यकता भासत नाही. निश्चितच, हे संशोधन शास्त्रज्ञांना विज्ञानाच्या नवीन उंचीवर नेईल.