मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई आशालता वाबगावकर यांचं निधन.

1 min read

मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई आशालता वाबगावकर यांचं निधन.

आशालता यांच्या गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, महानंदा व मत्स्यगंधा संगीत नाटकाने उदंड यश मिळवले.

मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई व सोज्वळ, प्रेमळ सासूबाई रंगवणाऱ्या चरित्र अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन. ७९ वर्षीय आशालता यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. आशालता यांच्या गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, महानंदा व मत्स्यगंधा संगीत नाटकाने उदंड यश मिळवले. अनेक सिल्व्हर ज्युबिली व गोल्डन ज्युबिली सिनेमात आशालता यांनी सकस भूमिका साकारल्या असल्या तरी अंकूश, आहिस्ता आहिस्ता, उंबरठा, वो सात दिन, कमला की मौत, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, सूत्रधार चित्रपटातल्या भूमिकासाठी त्यांना विशेष ओळखल्या जाते.