जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी एकतर निकामी किंवा भयावह आहेत बर्याच लोकांना अशा ठिकाणांविषयीही माहिती नसते. चला तर आज अशाच काही रहस्यमय ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात जी नक्कीच आश्चर्यचकीत करणारी ठरेल.

जर्मनीमध्ये एका अतिशय निर्जन भागात नदीवर एक विचित्र पूल आहे, ज्याला 'डेविल्स ब्रिज' म्हणून ओळखले जाते. काही लोकांचे असे म्हणने आहे की, हा पूल स्वतःच तयार झाला. तर काही लोकांचे असे म्हणने आहे की, भुतांनी हा पुल बनवला असेल. परंतु यामागचे खरे गुढ अद्याप उघड झालेले नाही.

शतकानुशतके ओसाड राहिलेल्या आयर्लंडमधील रोस्कोमॅन येथे एक राजवाडा आहे. 'मॅकडर्मोट कॅसल' म्हणून हा वाडा ओळखला जातो. असे म्हटले जाते की १२ व्या शतकात हा राजवाडा बांधण्यात आला होता. परंतु वाड्याचे काम पुर्ण होताच काही वर्षानंतरच त्याला आग लागली आणि राजवाड्यातील ३४ लोक जळून खाक झाले. तेव्हापासून हा राजवाडा निर्जन आहे. इथे कोणीही राहत नाही.

बेल्जियमच्या जंगलात बरीच वर्षे हजारो कार गंजलेल्या अवस्थेत पडून आहेत. असे सांगितले जाते की, या गाड्या अमेरिकन सैनिकांच्या आहेत. दुसर्या महायुद्धात बेल्जियममध्ये अमेरिकी सैनिक बराच काळ तैनात होते, परंतु युद्ध संपल्यावर त्यांना आपल्या या गाड्या अमेरिकेत घेऊन जाता आले नाही. तेव्हापासून या कार इथेच पडून आहेत.

१९१० च्या दशकात, अमेरिकेत हॉलंड बेटावर ३०० हून अधिक घरे होती, जिथे लोक राहत होते, परंतु नंतर समुद्राच्या जोरदार लाटाने येथील सर्व घरे पाण्यामध्ये एकरूप होत गेली. या बेटावर आता एकच घर उरले आहे, जे लोकांना खूप आश्चर्यचकित करते.