प्रत्येकाला आपला वाढदिवस खूप खास पद्धतीने साजरा करायचा असतो. त्यासाठी बरेचजण तसे प्रयत्नही करतात. अमेरिकेत राहणारया रूथ ब्रायंट नावाच्या महिलेलाही असेच काहीसे वाटले. तीला आपला वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करायचा होता, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पोलिसांना बर्याच युक्त्या कराव्या लागतील हे त्यांना पटवून देण्याची इच्छा होती. एका अहवालानुसार काऊन्टी शेरीफ ऑफिसने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत केली. रुथ ब्रायंटची इच्छा पूर्ण करण्यासाठी, कार्यालयाने दोन उप-अधिकारयांना अश्लील प्रदर्शनाचा आरोप ठेकून अरेस्ट वॉरंट पाठवले. यानंतर दोन पोलिसांनी ब्रायंट यांना हथकडीत ठेवले आणि कैदी म्हणून तुरूंगात नेले.
पोलिस कर्मचार्यांनीही त्यांना कैद्यांप्रमाणे वागवले, कारच्या सायरनसह त्यांना तुरूंगात आणण्यात आले. जेव्हा त्यांना तुरूंगात आणले जात होते तेव्हा त्या म्हणाल्या की, मला ढकलू नका, माझ्या गुडघ्यात खूप वेदना आहे. तरूंगात आणल्यावर त्यांना कैद्याचा एक नारंगी रंगाचा शर्ट देण्यात आला. काही काळ तुरूंगात ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. तुरुंगातून घरी परत येत असताना ब्रायंटने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याचे लोकांनी स्वागत केले आणि नंतर केक कापण्यात आला. विशेष म्हणजे हा त्यांचा शंभरावा वाढदिवस होता.