अशी रांझणे ज्यांचे अस्तित्व आजही एक रहस्य

1 min read

अशी रांझणे ज्यांचे अस्तित्व आजही एक रहस्य

मोठ मोठ्या दगडांनी बनवलेल्या हजारो रहस्यमय रांझणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील, जे संपूर्ण जगाला चकित करतात.

हे जग रहस्यमय गोष्टींनी परिपूर्ण आहे, ज्याबद्दल आपल्याला वेळोवेळी माहिती मिळते. परंतु  आजही जगात अशा काही रहस्यमय गोष्टी आहेत, ज्याची पुष्टी करण्यात वैज्ञानिक अपयशी ठरले आहेत. असेच एक रहस्य आशियाई देशातील लाओसमध्ये आहे, ज्याला 'प्लेन ऑफ जार' म्हटले जाते. मोठ मोठ्या दगडांनी बनवलेल्या हजारो रहस्यमय रांझणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील, जे संपूर्ण जगाला चकित करतात.

लाओसच्या शियांगखुआंग प्रांतात ९० पेक्षा जास्त प्रकारची अशी काही ठिकाणे आहेत जिथे ४०० पेक्षा जास्त दगडी रांझणे आहेत. या रांझणामध्ये काही अशी रांझणे आहेत ज्यांना दगडाच्या झाकणाने झाकण्यात आले आहेत. याची उंची एक ते तीन मीटर पर्यंत असल्याचे सांगितले जाते.

व्हिएतनाम युद्धादरम्यान १९६४ ते १९७३ च्या काळात अमेरिकन हवाई दलाने शियांगखुआंग प्रांतात २६ दशलक्षाहून अधिक क्लस्टर बॉम सोडले होते. त्यापैकी कोट्यावधी बॉम असे होते, जे फुटलेच नव्हते. या ठिकाणी बर्‍याच भागात आजही हे बॉम आहे तशाच अवस्थेत बघायला मिळतात. परंतु काही ठिकाणाहून हे बॉम काढले गेले आहेत.

पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ही हजारो रहस्यमय रांझणे लोह युगातील आहेत. परंतु त्यावेळी हे का तयार केले गेले याविषयीचे रहस्य अद्यापही अस्पष्ट आहे. पण काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, अंत्यसंस्काराच्या वेळी ते कलश म्हणून वापरले गेले असावेत.

या रहस्यमय आणि अनोख्या जागेला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. लाओस सरकारने यासाठी खूप आधी अर्ज केला होता, त्यानंतर ६ जुलै २०१९ रोजी वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.