अशी काही मंदिरे जी स्वतःच एक आश्चर्य

1 min read

अशी काही मंदिरे जी स्वतःच एक आश्चर्य

हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात दुर्गामाताचे एक मंदिर आहे जे, ज्वाला मंदिर किंवा ज्वालामुखी मंदिराच्या नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या मध्यभागी एक दिवा जळत आहे, असे म्हटले जाते की प्राचीन काळापासून हा दिवा नेहमीच जळत आला आहे. या दिव्यामधून निळी ज्योत निघताना दिसते. आजही हा दिवा तेव्हापासून निरंतर जळत आहे.

कर्नाटकच्या हम्पीमध्ये स्थित हे विरूपाक्ष मंदिर आपल्या सौंदर्याचेच एक रहस्य आहे. असे सांगितले जाते की, या मंदिरात असे काही खांब आहेत ज्यामधून संगीताचा आवाज येतो. म्युझिकल पिलर्स म्हणून हे खांब ओळखले जातात. या आवाजाचा शोध घेण्यासाठी इंग्रजांनी एक दिवस हे खांबही कट करून पाहिले परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. उलट आश्चर्य म्हणजे हे खांब त्यांना आतून रिकाम्या अवस्थेत आढळले.

कर्नाटक पासून सुमारे ५५ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे शिवगंगे मंदिर एका छोट्याश्या डोंगरावर वसलेले आहे. असे म्हणतात की, येथील पुर्ण डोंगर हे शिवलिंगासारखेच दिसते. याचे अजून एक वैशिष्टय असे की जर त्या शिवलिंगावर कुणी तुप अर्पण केले तर त्या तुपाचे चक्क दह्यात रूपांतर होते. या मागचे रहस्य आजही उलगडलेले दिसत नाही.

आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिरातील वास्तुशिल्पाचे एक महत्व आहे. या मंदिरात एक लटकणारा खांब आहे, जो जमीनीला स्पर्श करत नाही. या व्यतिरिक्तही असा एक दगड आहे ज्यावर पदचिन्ह बघायला मिळते. असे म्हटले जाते की, सीता माताचे हे पदचिन्ह आहे. विशेष म्हणजे २४ तास या पदचिन्हावर पाणी आढळून आले आहे. ते पाणी कितीही वेळा पुसले तरी आपोआप हे पदचिन्ह पुन्हा पाण्याने भरून जातात. पाणी नेमके येते कुठून हे आजही एक रहस्यच बनून आहे.

कर्नाटकातील हासनमध्ये स्थायिक असणारे हे हसनंबा मंदिर रहस्याने परिपुर्ण आहे. वर्षामध्ये फक्त एका आठवड्यासाठी हे मंदिर उघडले जाते. तेही फक्त दिवाळी दरम्यान. यावेळी पुजा अर्चना करून पुन्हा हे मंदिर बंद केले जाते. त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीच या मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येते. या मंदिराचे वैशिष्टय् म्हणजे मंदिर उघडल्यावर ज्यावेळी या मंदिरात दिवा लावला जातो. तर तो पुढच्यावर्षी मंदिर उघडे पर्यंत तसाच जळत असतो. एवढेच नाही तर जे फुल देवाला चढवले जातात तेसुद्धा आहे त्याच स्थितित वर्षभर तसेच टवटवीत दिसतात.