डांबर प्लांटच्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कंपनी प्रशासनाने सदर समस्येवर कुठलीही ठोस उपाय योजना न करता केवळ काम चलाऊ आणि वेळकाढूपणा च धोरण अवलंबले आहे

डांबर प्लांटच्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

श्वेता भेंडारकर/नगभीडः तालुक्यातील मोहाडी मो(कुणघडा चक) येथे बऱ्याच वर्षापासून डांबर प्लांट कार्यरत, अस्तित्वात आहे. मात्र सध्या त्यातून होणाऱ्या वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या प्लांटमधे परिसरातील अनेक ड्रायव्हर,मजुरांना रोजगार मिळत आहे, ही समाधानाची बाब असली तरी काही महिन्यापासून सदर प्लांट मधे लावलेल्या नविन डांबर मिक्सर मशीनमुळे मोठ्या प्रमाणात डस्ट आणि धुराच्या प्रमाणात वाढ झाली असून सभोवतालच्या परिसर प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ होणे, घशाचे, श्वसनाचे, त्वचेचे आजार होणे, कॅन्सर, या सारख्या आजारांच्या समस्यांना परिसरातील नागरिकांना तसेच त्यांच्या लहान मुलाबाळांना भविष्यात समोरे जावे लागण्याची दाट शक्यता वजा भीती निर्माण झाली आहे.

कारण सदर डांबर प्लांट पासुन अगदी काही अंतरावरच रहिवासी वस्ती, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, तलाठी कार्यालय, नूतन शिवाजी विद्यालय देखील आहे. त्यामुळे सदर प्रदूषणाची समस्या भविष्यात आपलं उग्र आणि गंभीर स्वरुप धारण करण्यापूर्वीच कंपनी प्रशासनाने त्यावर योग्य आणि ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात परिसरातील नागरिकांना आणि त्यांचे कुटुंबीयांना किंवा कंपनी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाची वा आजाराची भिती राहणार नाही. आणि याच अटीवर बहुतेक ग्रामपंचायतीतर्फे कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. सदर प्रदूषणाबाबत परिसरातील नागरिक तसेच काही युवा कार्यकर्ते यांनी या आदी अनेकदा कंपनीच्या व्यवस्थापक बरोबर बोलण करून समस्याचे गांभीर्य कंपनी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र कंपनी प्रशासनाने सदर समस्येवर कुठलीही ठोस उपाय योजना न करता केवळ कामचलाऊ आणि वेळकाढूपणा च धोरण अवलंबत परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडल्याचे दिसून येत असून यामुळें सुज्ञ नागरिकात तीव्र नाराजी दिसत आहे. तसेच प्रदूषण महां मंडळ असो किंवा इतर सबंधित विभागाच्या जवाबदार अधिकाऱ्यांनी ही या प्रदूषणाच्या समस्येकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष न करता तात्काळ प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना व कारवाई करावी जेणकरून भविष्यात नागरिकांचा रोष वाढणार नाही अशी मागणी संजय रामटेके यांनी परिसरातील नागरीकांचे वतीने केली आहे .


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.