शेतकऱ्यांकडून एक हजाराची लाच घेताना सहाय्यक अभियंता जाळ्यात

सोलारपंपच्या अनुदान अर्जावर सह्या करण्यासाठी प्रती सही पाचशे रुपये द्यावे लागतील, असे म्हणत दोन सह्यांचे एक हजार रुपये दिले तरच सह्या देईल सहाय्यक अभियंत्यांची होती मागणी

शेतकऱ्यांकडून एक हजाराची लाच घेताना सहाय्यक अभियंता जाळ्यात

परभणीः सोलारपंपच्या अनुदान अर्जावर सह्या करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह अन्य एकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार रोजी रंगेहात पकडले.

तक्रारदार असलेल्या व्यक्तीने शक्ती कंपनीतर्फे सोलरपंप बसवले. पाठोपाठ अनुदान मिळविण्यासाठी महावितरण कंपनीतील जिंतूर ग्रामीण (बोरी) चे सहाय्यक अभियंता सुधाकर जाधव यांच्यासह कंत्राटी तंत्रज्ञ बाळासाहेब बुधवंत यांना १८ फेब्रुवारी रोजी संपर्क साधला. त्यावेळी अर्जावर सही करावयाची असेल तर प्रती सही पाचशे रुपये द्यावे लागतील, असे म्हणत दोन सह्यांचे एक हजार रुपये दिले तरच सह्या देईल, असे सहाय्यक अभियंत्यांनी म्हटले.

लाच देण्यास इच्छुक नसल्याने तक्रारकर्त्याने चलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलूचपत प्रतिबंधकचे पोलिस उपाधीक्षक भरत हुंबे, पोलिस निरीक्षक अमोल कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची शहानिशा करून सोमवारी हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल कडू, कर्मचारी जमील जागीरदार, अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, शेख मुखीद, शेख मुख्तार, माणिक चट्टे, सावित्री दंडवते, सारिक टेहरे, रमेश चौधरी, जनार्धन कदम आदींच्या पथकाने सापळा लावला. तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक अभियंत्यासह कंत्राटी कर्मचार्‍यास रंगे हात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ऊशीरापर्यंत सुरू होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.