कर्तबगार राज्यात अत्याचार

"कर्तबगारांच्या राज्यात अत्याचार" अशी सगळी स्थिती महाराष्ट्राची आहे. उत्तर प्रदेश, जम्मु कश्मीर, हाथरस, उन्नाव या सगळ्या घटना जितक्या मोठ्या प्रमाणात मांडण्यात आल्या, तितक्या महाराष्ट्रातल्या मांडण्यात येतात का?

कर्तबगार राज्यात अत्याचार

महाराष्ट्रः राज्याचे मुख्यमंत्री जगातले सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत, त्यांचे विरोधक त्यांना ब्रह्मांडातले उत्तम मुख्यमंत्री म्हणतात. त्यांचे समर्थक त्यांच प्रचंड कौतुक करतात. या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या राज्यातली म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली स्थिती काय आहे? "कर्तबगारांच्या राज्यात अत्याचार" अशी सगळी स्थिती आहे. उत्तर प्रदेश, जम्मु कश्मीर, हाथरस, उन्नाव या सगळ्या घटना जितक्या मोठ्या प्रमाणात मांडण्यात आल्या, तितक्या महाराष्ट्रातल्या मांडण्यात येतात का? दिल्लीतल्या निर्भयाची घटना जगभर चर्चीली गेली कारण तो बलात्कार देशाच्या राजधानीत झाला होता. अशा स्वरुपाच्या निर्भया ज्या भयापोटी बळी पडल्या आहेत तशा असंख्य घटना महाराष्ट्रात रोज घडत आहेत. महाराष्ट्रासाठी सप्टेंबरचा महिना हा अक्षरशः बलात्काराचा महिना म्हणून पुढे आला आहे.

बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत, खरंतर अशा घटनांची मांडणी करावी लागणं हेच दुर्देवी आहे. कपड्यातही स्त्रीचा नग्न देह बघणारे नराधम, बेमुर्वदखोरपणे कायद्याचा धाक न बाळगता फिरत आहेत यापेक्षा दुर्देवी गोष्टी कोणती? या घटना ईतक्या दुर्देवी आहेत. यथा राजा, तथा प्रजा अशी स्थिती होते आहे का? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. राज्याचे राजकारणीच बदफैली, बलात्कार, विनयभंग करणारे जेव्हा जन्माला येतात तेव्हा तशीच प्रजा होते किंबहुना अशा वृत्तीच्या लोकांच धाडस वाढतं. सप्टेंबर महिन्यात किती घटना घडल्या हे आपण पाहुयात.

मुंबईच्या साकीनाका घटनेचा सगळीकडे उल्लेख होतो आहे, तिला मुंबईची निर्भया म्हंटल जात आहे. अतिशय विकृत आणि कृर पद्धतीने तिला मारण्यात आलं, तिचं शील लुटण्यात आलं, त्या पिडीतेचा मृत्यू झाल्यानंतर सगळ्या राजकारण्यांना जाग येते. अमरावतीमध्ये सातत्याने एका मुलीच्या शरीराशी खेळलं जातं आणि शेवटी ती आत्महत्या करते. ही घटना नुकतीच घडली आहे. पुण्यात १४ वर्षांच्या मुलीवर तेरा-चौदा जण बलात्कार करतात, यापेक्षा दुर्देवाची घटना कोणती? सांगवी पोलिसठाण्यात एका घटनेची नोंद झाली. निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचं सांगुन एका सावकाराने एका शिक्षिकेवर बलात्कार केला आहे. या घटनांचा उल्लेख केला तरी संताप झाल्याशिवाय रहात नाही.

७ सप्टेंबरला पुण्यात चौदा वर्षांच्या मुलीवर तेरा नराधमांचा अत्याचार, ९ सप्टेंबरला पुण्यात सहा वर्षांच्या चिमुकलीवर अपहरण करुन बलात्कार, खेडमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर दोन महिने सलग सहा नराधमांकडुन बलात्कार, १० सप्टेंबरला मुंबईतली घटना, ११ तारखेला सतत अत्याचार अमरावतीतली एका मुलीची आत्महत्या, पुण्याच चार, नागपुरमध्ये एक, मुंबईत एक, औरंगाबादमध्ये एक इतक्या घटना ऐकल्यावर हे राज्या कर्तबगारांऐवजी अत्याचा-यांच राज्य झालं आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. हाथरसच्या घटनेवळी अशा घटना घडु नये म्हणून वारंवार त्यावर भाष्य करणा-या मुख्यमंत्र्यांच्याच राज्यात इतक्या बलात्काराच्या घटना घडत आहेत.

या घटना महाराष्ट्रातच का घडत आहेत याचा विचार केला तर काही गोष्टी नक्कीच समोर येतात. संजय राठोडांच्या संबंधामुळे एक मुलगी आत्महत्या करुन मरते, धनंजय मुंडेंवर एक मुलगी तक्रार करते, दुसरी बाई परळीत जाऊन पत्रकार परिषद घेते तीच्यावर गुन्हे दाखल होतात, सत्ताधारी पक्षाच्या युवक शाखेचा अध्यक्ष औरंगाबादमध्ये एका गुन्ह्यात अडकतो आणि तोही फक्त बलात्काराच्या, लातुरमधल्या एका अधिका-याला अशाच विनयभंग आणि नोकरीसाठी शरिरसुख मागितल्याप्रकरणी निलंबीत केलं जातं, छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात महिला तलाठ्याला बदली नको असेल तर उपजिल्हाधिका-याकडुन शरिरसुखाची मागणी केली जाते. ज्या राज्यातील नेते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकारी स्त्रीदेह भोगण्याची अपेक्षा ठेवतात त्या राज्यात कर्तबगार लोक असतील तरीही अशा स्वरुपाची गुन्हेगारी प्रवृत्ती ठेवणा-या माणसांचही बळ वाढणार, हे सुर्यप्रकाशाईकं स्पष्ट आहे. राज्याचा कारभारीच अशा लोकांना समर्थन देत असेल आणि त्यांच्या सोबत मिळुन काम करत असेल तर त्या राज्याची कर्तबगारी स्त्रीची अब्रु लुटण्यावरच दिसणार आहे.

  • सुशील कुलकर्णी


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.