जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हारताळ

जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरातच फळांची विक्री

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हारताळ

परभणी: गेल्या काही दिवसांपासून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी किराणा, भाजीपाला, फळविक्रेते यासह सर्वांनाच विक्रीसाठी बंदी घातली आहे. दरम्यान, चार दिवस सकाळी ११ वाजेपर्यंत या विक्रीला जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी परवानगी दिली होती. मात्र असे असतानाही जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकार्‍यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच फळांचे गाडे विक्रीसाठी उभे राहत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशाला हारताळ फासला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून परभणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात कोरोना साथीचे थैमान सुरु आहे. दररोज किमान हजारांवर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर गेली काही दिवस जिल्हाधिर्‍यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बाजारात अनेक दुकाने मागच्या दाराने सर्रासपणे सुरु आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी चार दिवस सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत विक्रीला परवानगी दिल्यानंतर बाजारपेठेत मोठी गर्दी उसळून आली. त्यानंतरही अनेक ठिकाणी दुकानदार मागच्या बाजुने व्यवसाय करताना दिसून येत आहेत. दरम्यान, वसंतराव नाईक पुतळा परिसरात अनेक दवाखाने आहेत. त्यामुळे या परिसरात अनेक फळ विक्रेते बंदी असताना सर्रास विक्री करत आहेत.

विशेष म्हणजे याच परिसरात पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान आहे. दिवसभरातून दोनवेळा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी या रस्त्यावरुन जात असतात. अशावेळी शिवाजीनगर परिसरात मुख्य रस्ता सोडून मधल्या रस्त्याने हे गाडेवाले उभे राहत आहेत. विशेष म्हणजे यावेळी सोशल डिस्टंन्सींगचे कसलेही पालन होताना दिसत नाही. विशेषत: ग्राहकांची गर्दी होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ही सर्रास होत असलेली विक्री बंद करावी, अशी मागणी होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.