पोलीसांच्या तत्परतेमुळे अट्टल घरफोड्या ताब्यात

1 min read

पोलीसांच्या तत्परतेमुळे अट्टल घरफोड्या ताब्यात

'नागरिकांची सतर्कता, पोलीसांची तत्परता'

सुमित दंडुके/औरंगाबाद : काल दि.०५ रात्रीच्या सुमारास शहरातील एमरॉन्ड सिटी येथील बंद घरी कोणीतरी अज्ञात इसम शिरल्याचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा मुलगा यतार्थ याने बघितले. त्यांने तात्काळ घटनेची माहिती पोलीसांना कळविल्याने अवघ्या काही वेळातच पुंडलीकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस पकडले.
किशोर पाटील हे त्यांचे एमरोन्ड सिटीमधील राहत्या घराला कुलूप लावून कल्याण येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत रात्रीच्या वेळी आरोपी श्रीरंग प्रभाकर हिवाळे (वय.२३,रा.राजनगर.मुकुंदवाडी) हा कुलूप तोडून घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरला. याचवेळी यतार्थ राजेंद्र जंजाळ याने आरोपीस बघितले व वडील राजेंद्र जंजाळ यांना माहिती दिली. जंजाळ यांनी तत्काळ पोलीसांना माहिती देताच पुंडलीकनगरचे सपोनि.घनश्याम सोनवणे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत आरोपीस पकडले.
आरोपी श्रीरंग हा रिकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल असल्याचे समजले. तसेच सदरील घरफोडीमध्ये वापरलेली प्लेझर स्कूटी देखील, त्याने ३ दिवसांपूर्वी एस.टी कॉलनी येथून चोरल्याची कबूली आरोपीने दिली.
WhatsApp-Image-2020-10-05-at-4.59.13-PM
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी यतार्थ राजेंद्र जंजाळ यांच्या समयसुचकतेचे तसेच पुंडलीकनगर पोलीसांच्या तत्परतेचे कौतुक केले.
सदरील कामगिरी पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सपोनि.घनश्याम सोनवणे, पोउपनि.प्रभाकर सोनावणे, व सहकार्यानी यशस्वी पार पाडली.