संजय राऊतांकडून छळवणूकीचा प्रयत्न;उच्चशिक्षित महिलेची हायकोर्टात तक्रार

शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने गंभीर आरोप करत ' ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा' तक्रार अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल केला.

संजय राऊतांकडून छळवणूकीचा प्रयत्न;उच्चशिक्षित महिलेची हायकोर्टात तक्रार

मुंबई: शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने गंभीर आरोप करत ' ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा' तक्रार अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल केला. अॅड. आभा सिंग यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला. यामध्ये हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे,आपल्या मागे माणसे लावणे, धाक दाखविणे यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याअगोदर माहिम पोलीस ठाण्यात 2013 मध्ये माझ्या उपहारगृहा बाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी आणि २०१८ मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता; मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही,' असही या महिलेने याचिकेत म्हटले आहे.

गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी दाद मागितली. मात्र, काही उपयोग झाला नाही. शेवटी मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. अखेर आयोगाने एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, तरीही बीकेसी-परिमंडळ ८च्या पोलिस उपायुक्तांनी त्याची आजतागायत दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे,' असल्याचे महिलेने याचिकेत मांडले आहे.

यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र आहे. मात्र यावर राऊत यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर होत असलेले गंभीर आरोप आणि आता संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने गंभीर आरोप करत हायकोर्टात दाखल केलेली तक्रार यामुळे पक्ष आणि राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.