औंढा नागनाथ येथील 8 वे ज्योतिर्लिंग असलेलं नागनाथ मंदिराच दर्शन आज सायंकाळपासून बंद

1 min read

औंढा नागनाथ येथील 8 वे ज्योतिर्लिंग असलेलं नागनाथ मंदिराच दर्शन आज सायंकाळपासून बंद

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय

प्रतिनिधी/ हिंगोली: भारतातील 12 ज्योतिर्लिंग एक असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेलं मंदिर आज सायंकाळ पासून बंद करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी यांच्या आदेशानुसार तसेच संस्थानाचे अध्यक्ष, दंडाधिकारी व संस्थान समिती यांनी हा निर्णय घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. मंदिरातील दैंनदिन पूजा, आरती सुरू राहणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. भक्तांनी औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन देखील मंदीर प्रशासनाने केल आहे.