औरंगाबादेत भरदिवसा गोळीबार करत बिल्डरचं अपहरण आणि सुटका

1 min read

औरंगाबादेत भरदिवसा गोळीबार करत बिल्डरचं अपहरण आणि सुटका

भरदिवसा असे प्रकार घडत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरातील देवानगरी भागात बांधकाम व्यावसायीकाचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं. यावेळी अपहरणकर्त्यांनी हवेत गोळीबार देखील केला. यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण प्रकरण असे की, नझीम पठाण राऊफ पठाण यांनी शहरातील देवानगरी भागातील मदन भोसले यांच्या घर बांधकामाचा ठेका घेतला आहे. यावेळी पठाण कामाच्या ठिकाणी माहिती घेत असतानाच तीन ते चार लोक पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हवेत गोळीबार करीत पठाण याना गाडीमध्ये टाकले आणि पसार झाले, या झटापटीत पठाण यांच्या एका पायाला गोळी देखील लागली. पुढे काही किलोमीटरवर शहराच्या बाहेर चित्ते पिंपळगाव जवळ गाडीचे डिझेल संपल्यामुळे आरोपींनी गाडीसह पठाण याना तिथेच सोडून दिले व पळून गेले. घटनेची माहिती मिळताच सदरील भागातील पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भरदिवसा असे प्रकार घडत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. या घटनेमुळे पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक आहे की नाही, असाच प्रश्न निर्माण होतो.