औरंगाबाद कोरोना : गुरुवारी सर्वाधिक 132 नविन रुग्ण

1 min read

औरंगाबाद कोरोना : गुरुवारी सर्वाधिक 132 नविन रुग्ण

आतापर्यंत 1317 रुग्ण बरे, 121 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

स्वप्नील कुमावत/औरंगाबादः जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी दि. 11 जुन रोजी 132 नविन रुग्ण आढळले. एकूण रुग्णांची संख्या 2407 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1317 रुग्ण उपचारानंतर बरे झाले. 121 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 969 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशीलः
जयसिंगपुरा बेगमपुरा 1, मिसरवाडी 1, सुभेदारी विश्रामगृहा जवळ 1, उस्मानपुरा 2, एन आठ 1, जुना बाजार 1, आकाशवाणी परुसर 1, उल्कानगरी 1, संजय नगर 1, एन दोन सिडको 1, गणेश कॉलनी 1, बुड्डीलेन 1, बायजीपुरा 1, बंजारा कॉलनी 1, हेडगेवार रुग्णालय परिसर 1, एमजीएम रुग्णालय परिसर 1, शिवाजी नगर 5, उत्तम नगर 3, कैलास नगर 7, गादिया विहार 1, सहकार नगर 1, नक्षत्रवाडी 1, चेलीपुरा 1, टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी 1, संजय नगर, बायजीपुरा 1, एन सात सिडको 1, न्यायनगर 2, हुसेन कॉलनी 1, संजय नगर, मुकुंदवाडी 1, सातारा परिसर 1, साईनगर, एन सहा 2, एन आठ सिडको, गजाराज नगर 1, पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा 2, हरिप्रसाद अपार्टमेंट 1, दशमेश नगर 1, पद्यपुरा 2, गांधीनगर 3, सिल्कमिल कॉलनी 1, विशाल नगर 3, बेगमपुरा 2, गोविंद नगर 1, समता नगर 1, फाजीलपुरा 4, नयू हनुमान नगर 5, सिडको एन आठ 12, गौतम नगर, घाटी परिसर 2, रशीदपुरा1, मयुर पार्क म्हसोबा नगर 1, भवानी नगर 2, भारतमाता नगर 3, विजय नगर 1, गारखेडा, गजानन नगर 1, कोहिनूर कॉलनी 1 , जिल्हा परिषद परिसर 1, हर्सुर सांवगी 1, सिव्हील हॉस्पीटल परिसर 3, टिव्ही सेंटर 1, बिस्मिला कॉलनी 3, सिडको वाळूज महानगर एक 2, एकता नगर, हर्सुल परिसर 1, बजाज नगर 7, साई नगर, पंढरपूर 3, जुनी मुकुंदवाडी 7, नारेगाव 1, गंगापूर 1, नायगाव 1, सिल्लोड 1, उपसंचालक आरोग्या कार्यालय परिसर 1, अन्य 1 या भागात कोरोनाबाधित रुग्णा आढळले. यामध्ये 57 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.