२१ जूनपासून औरंगाबाद जिल्हा अनलॉक

सोमवारपासून जिल्ह्यातील लॉकडाऊनसंबंधित नियम शिथिल केले जाणार आहेत.

२१ जूनपासून औरंगाबाद जिल्हा अनलॉक

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक होणार आहे. औरंगाबाद शहराची रुग्णसंख्या कमी असल्यामुळे शहर १०० टक्के अनलॉक करण्यात आले होते. मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक असल्यामुळे निर्बंध कायम होते. आता ग्रामीणची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात जिम, सलून, मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह, विवाह,कार्यक्रमांना ५०% क्षमतेच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. तसेच आता शासकीय कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

राज्यातील, देशातील कोरोना अजून संपलेला नाही, केवळ कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे काही कडक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रसासनाने घेतला आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा पसरू नये, कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजेत. मास्क लावा, सतत हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा, या त्रिसुत्रीचं पालन करायला हवं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा – जिल्हाधिकारी
नुकतंच औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार, प्रत्येक शाळेत शाळा नियोजन समितीची बैठक घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शाळा निर्जंतुकीकरण कारण्यासोबत हात धुणे, सॅनिटायझर वापरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाने आदेश दिल्या जात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.