दिल्लीपेक्षा औरंगाबादचं सुरक्षित..!

1 min read

दिल्लीपेक्षा औरंगाबादचं सुरक्षित..!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होताना तुलनात्मक विचार केल्यास कोरोना संक्रमण रोखण्यात दिल्लीपेक्षा औरंगाबादची हवा काहीशी आरोग्यदायी ठरेल

औरंगाबाद: लाॅकडाऊनमध्ये औरंगाबादच्या हवेच्या गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाल्याने प्रत्येकाला आरोग्यदायी मोकळा श्वास घेता आला. हे जूनमध्ये अर्बन मिशनच्या अहवालावरून स्पष्ट झाले होते. अनलाॅकनंतर प्रदूषणात वाढ होताना दिसत असली तरी दिल्लीच्या तुलनेत औरंगाबादचे प्रदूषण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होताना तुलनात्मक विचार केल्यास कोरोना संक्रमण रोखण्यात दिल्लीपेक्षा औरंगाबादची हवा काहीशी आरोग्यदायी ठरेल, असे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सतीश पाटील यांनी सांगितले. अतिसूक्ष्म धूलिकण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि कार्बन मोनाक्साईड या प्रदूषकांच्या ठरलेल्या मर्यादांत दिल्लीपेक्षा औरंगाबाद मर्यादेच्या काठावर तर दिल्ली तीव्र अतितीव्र श्रेणीत मोडते. यात अनेक घटक मोडतात. उद्योग, वाहनांची संख्या आणि तापमानाचाही विचार झाल्यास औरंगाबादेतील प्रदूषण दिल्लीच्या तुलनेत कमी आहे.