औरंगाबाद जिल्ह्यात 2293 कोरोनामुक्त, आज 14 रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात 2293 कोरोनामुक्त, आज 14 रुग्णांचा मृत्यू


औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2293 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1774 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 263 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 149 आणि ग्रामीण भागातील 114 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 4299 कोरोनाबाधित आढळले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
दुपारनंतर आढळून आलेल्या 33 रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत 25 रुग्ण, ग्रामीण  भागातील 08 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये 17 महिला आणि 16 पुरुष रुग्ण आहेत. दुपारनंतर औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे ( कंसात रुग्ण संख्या ) आहे. बजाज नगर (1), जाधववाडी (1) सिल्क मिल कॉलनी (1), भारत माता नगर (1), गल्ली  क्रमांक नऊ, हुसेन कॉलनी (1),  गादिया पार्क (1),  पहाडसिंगपुरा (1),  मयुर पार्क (1),  जयसिंगपुरा (2),  मनपा परिसर (1),  एसटी कॉलनी गारखेडा (1), देवगिरी अपार्टमेंट, जाधववाडी (1),  जय भवानी नगर (1),  विनायक नगर, देवळाई (1), हिंदुस्थान आवास (1), शिवाजी नगर (1), कबीर नगर (1), बारी कॉलनी  (1), राज  बाजार (1), शहागंज (1),  जय भावानी नगर (3), रोशन गेट (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
ग्रामीण भागातील रुग्ण
रघुनाथ कॉलनी (1), वडगाव (1),  बजाज नगर (1), अज्मशाहीपुरा खुलताबाद (4), खुलताबाद (1)  या भागातील कोरोनाबाधित आहेत.
आतापर्यंत 2293 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 2293 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. एकूण 76 कोरोनाबाधित रुग्णांना आज सुटी देण्यात आलेली आहे. या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत 45, उर्वरीत 31 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
घाटीत बारा, खासगीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयामध्ये (घाटी) 23 जून रोजी रात्री 7.40 वा. रेहमानिया कॉलनीतील 40 वर्षीय स्त्री रूग्णाचा, दुपारी एक वाजता छावणीतील पेंशनपुऱ्यातील 55 वर्षीय पुरूष, कटकट गेट येथील 66 वर्षीय पुरूष, 24 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता नूतन कॉलनीतील 60 वर्षीय स्त्री, रात्री 9.30 वाजता सइदा कॉलनीतील 73 वर्षीय पुरूष, रात्री 11.10 वाजता एन 13, भारत नगरातील 70 वर्षीय स्त्री, 25 जून रोजी मध्यरात्री एक वाजता नॅशनल कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष, पहाटे  3 वाजता मुजीब कॉलनीतील, रोशन गेट येथील 65 वर्षीय पुरूष, पहाटे 6.30 वाजता देवळाईतील 52 वर्षीय पुरूष, सकाळी 7.30 वाजता मदनी चौकातील 70 वर्षीय पुरूष, सकाळी 8 वाजता फाजलपुरा येथील 50 वर्षीय स्त्री, सकाळी 8.15 वाजता अझमशाहीपुरा, खुलताबाद येथील 60 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीमध्ये आतापर्यंत एकूण 176 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 173 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.
तर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खुलताबाद येथील 60वर्षीय पुरूष रुग्णाचा, अन्य एका खासगी रुग्णालयामध्ये 53 वर्षीय बजाज नगरमधील पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 173, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 58, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 232 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.