Aurangabad Corona – औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 3106, आज 70 रूग्णांची वाढ

Aurangabad Corona – औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 3106, आज 70 रूग्णांची वाढ

औरंगाबाद: औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतच आहे.आज दि.(18) 70 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या 3106 झाली आहे. तर 1716 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता 1224 रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. घाटी हॉस्पीटल परिसर (1), नॅशनल कॉलनी (1),सिंधी कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), पडेगाव (1), लक्ष्मी कॉलनी (2), हर्सुल, जटवाडा (1), म्हसोबा नगर, मयूर पार्क (1), खोकडपुरा (3), जय भवानी नगर, गल्ली नं. चार (2), एन आठ सिडको (2), एन नऊ,सिडको (2), महू नगर (1), गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), एन बारा, हडको (1), कैसर कॉलनी (2), चिकलठाणा (1), नंदनवन कॉलनी (2),मिसारवाडी (1), नूतन कॉलनी (2), गांधी नगर (1), मुकुंदवाडी (1), सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर (1), नागेश्वरवाडी (1), श्रीराम नगर (1), रामेश्वर नगर (1), न्यू विशाल नगर (1), आझाद चौक (3), पुंडलिक नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (1), श्रीविहान कॉलनी (1), शक्ती अपार्टमेंट (1), गणेश कॉलनी (2), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), जाधववाडी, नवीन मोंढा (1), साई नगर, सिडको (1), टीव्ही सेंटर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (1), औरंगपुरा (1), सुभाषचंद्र नगर, एन अकरा (1), जय भवानी नगर, गल्ली नं. एक (1), रामदेव नगर (1), बजाज नगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (5), सिडको महानगर दोन (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 31 स्त्री व 39 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.