औरंगाबाद मनपा आयुक्त तथा प्रशासक पांडेय यांना कोरोनाची लागण

काल काहीसा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली होती, आज सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ट्वीट करत त्यांनी याची माहिती दिली.

औरंगाबाद मनपा आयुक्त तथा प्रशासक पांडेय यांना कोरोनाची लागण

सुमित दंडुके/औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच जात आहे. सर्व सामान्यांबरोबरच प्रशासकीय अधिकार्याना देखील कोरोनाची लागण होत आहे. काही दिवसांपुर्वीच महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांना कोरोनाची लागण झाली होती. आज मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले आहे.(Aurangabad Municipal Commissioner and Administrator Pandey contracted corona)

पांडेय यांना काल शनिवारी काहीसा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी मेल्ट्रॉन येथे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वँब दिला होता. त्यांचा आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ट्वीट करत त्यांनी याची माहिती दिली आहे.

'प्रिय मित्रांनो,
माझा कोविड -19 टेस्ट चाचणी अहवाल सकारात्मक आली आहे. माझे सर्व एचआरसी आणि एलआरसीे यांनी विलगीकरणात राहून चाचणी करून घ्यावी.
मी मेल्ट्रॉनमध्ये ब्लड टेस्ट, सीटी आणि इतर टेस्ट केली.
लसीकरणामुळे कोरोनाची लक्षण आणि फुफ्फुस व शरीराचे नुकसान फारच कमी आहे.
मी घरातून काम करत राहील.'
अस त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.