औरंगाबाद पुन्हा लॉकडाऊन

1 min read

औरंगाबाद पुन्हा लॉकडाऊन

शहरामध्ये 10 ते 18 जूलै दरम्यान कडक लॉकडाऊन लागू. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असेल.

औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोनाग्रस्ताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात रोज 200 ते 250 कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहरात 10 जुलै ते 18 जुलैपर्यंत कडक संचारबंदी असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे.

lokdaun

दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 200 ते 250 रुग्णांची वाढ होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमामात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनासमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला संपुर्ण औरंगाबाद 6 हजार 680 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये 310 जणांचा मृत्यू झाला आहे. यात पार्श्र्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत 10 जुलैपासून शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी संचारबंदीचे कडक नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

aurangabvd