३० वर्षांपूर्वीच औरंगाबादचे नामांतर - संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अगोदरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे, त्यावर फक्त सही, शिक्का उमटायचा आहे असे वक्तव्य राऊतांनी केले...

३० वर्षांपूर्वीच औरंगाबादचे नामांतर - संजय राऊत

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे केले आहे, त्यावर फक्त सही, शिक्का उमटायचा आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यात सध्या औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी जोर धरतेय. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतराचा वाद चव्हाट्यावर आला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही नामांतराला विरोध केला आहे.
त्यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असे वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं ही जनतेच्या मनातली इच्छा आहे.

राऊतांचा भाजपला सवाल
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करावे, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळाने केंद्राकडे पाठवला होता. त्यामुळे भाजपने दिल्लीत जाऊन नामांतर का झाले नाही याचा जनतेसमोर खुलासा करावा. असे राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर आवाहन ठेवले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.