औरंगाबादकरांनो स्मार्ट सिटी बसच्या भाड्यात ७ टक्क्यांनी वाढ.

1 min read

औरंगाबादकरांनो स्मार्ट सिटी बसच्या भाड्यात ७ टक्क्यांनी वाढ.

स्मार्ट सिटी बस उद्या पासून सुरु.

सुमित दंडुके/औरंगाबाद : कोरोना महामारीपासून बंद असलेली स्मार्ट सिटी बस अखेर उद्या दि.५ पासून सुरु होत आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे बसच्या तिकिट दरातही ७.६१ टक्के वाढ करण्यात आली आहे. बससेवेचे सुधारित दर व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चात वाढ झाल्यामुळे सिटी बसचे तिकीट दरही वाढविण्यात आले आहेत. जानेवारी २०१९ च्या तुलनेत प्रत्येक किलोमीटरला ३.४२ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे .

शहरातील या मार्गांसाठी असा असेल दर :

रेल्वेस्थानक ते शहांगज : 15 रुपये ,

रेल्वेस्थानक ते हर्सूल सावंगी : 25 रुपये ,

औरंगपुरा ते बजाजनगर मार्गे मध्यवर्ती बसस्थानक : 25 रुपये ,

चिकलठाणा ते रांजणगावमार्गे बाबा पेट्रोल पंप : 30 रुपये ,

सिडको ते विद्यापीठ मार्गे क्रांती चौक : 25 रुपये ,

रेल्वेस्थानक ते भावसिंगपुरा मार्गे क्रांती चौक : 20 रुपये ,

मध्यवर्ती बसस्थानक ते बिडकीन : 35 रुपये ,

मध्यवर्ती बसस्थानक ते फुलंब्री : 40 रुपये ,

मध्यवर्ती बसस्थानक ते वेरूळ : 45 रुपये.