औरंगाबादचे नामांतर लवकरच?

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी १० वेळा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला....

औरंगाबादचे नामांतर लवकरच?

औरंगाबाद : आज शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी सुभाष देसाई हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी हीच ती योग्यवेळ असल्याचे सांगत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर लवकरच करणार असल्याचे काही दिवसांपुर्वी सांगितले होते. याबाबत पालकमंत्र्यांच्या शुक्रवारच्या सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात प्रत्यंतर आले.

या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम सुभाष देसाई यांच्या अधिकृत लेटरहेडवरून जाहीर करण्यात आला आहे. यात देसाई यांनी 'संभाजीनगर’ असा उल्लेख केला आहे. विशेष कार्यकारी अधिकारी नितीन शिंदे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्याचा उल्लेखच पालकमंत्र्यांचा 'मुंबई-संभाजीनगर दौरा' असा करण्यात आला आहे.

यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाहीर करताना औरंगाबाद विभागाशी संबंधित निर्णयाची माहिती सीएमओच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर देखील औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. एकंदरीत आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचे यावरून जाणवत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर असल्यामुळे या दोन पक्षांची भूमिका काय असेल या संदर्भातही अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.