औरंगाबाद हादरले..! बारा तासात दुसरी खुनाची घटना

औरंगाबाद हादरले..! बारा तासात दुसरी खुनाची घटना

औरंगाबाद : शहरात अवघ्या बारा तासात दोन खुनाच्या घटना घडल्याने औरंगाबाद शहर पोलिसांची झोप उडाली आहे. काल रात्री दारुपिण्याच्या वादातून सिधार्थ रंगनाथ हिवराळे या तरुणाची बजरंग चौक येथील विश्वास वाईन शॉप समोर चाकुने भोसकुन हत्या करण्यात आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही,तोच आणखी एक खुनाची घटना शहरातील एन-2 सिडको भागात घडली. डॉ.राजन शिंदे असे खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. ते मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

आज सकाळी त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले तेव्हा राजन शिंदे यांचा मृतदेह घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.