Aurangabad Update: जिल्ह्यात 102 नविन कोरोनाबाधित रूग्ण

1 min read

Aurangabad Update: जिल्ह्यात 102 नविन कोरोनाबाधित रूग्ण

औरंगाबाद : जिल्ह्यात दि. 20 जून रोजी सकाळी 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3340 इतकी झाली आहे. यापैकी 1781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 179 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1380 रुग्णांवर उपचार आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील
नवजीवन कॉलनी (1), गरम पाणी (1), पडेगाव (1), जाधववाडी (2), राजाबाजार (1), एन नऊ हडको (1), ठाकरे नगर (1), बजाज नगर (1), एन सहा (1), शिवाजी नगर (1), नागेश्वरवाडी (3), शिवशंकर कॉलनी (2), गजानन नगर (2), छत्रपती नगर (1), दर्गा रोड (1), एकता नगर, हर्सुल (1), हनुमान नगर (1), सुरेवाडी (3), टीव्ही सेंटर (1), एन आठ सिडको (1), श्रद्धा कॉलनी (4), एन सहा, सिंहगड कॉलनी (1), आयोध्या नगर (1), बायजीपुरा (3), कोतवालपुरा (1), नारळीबाग (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (4), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (1), समता नगर(1), सिंधी कॉलनी (1), बजाज नगर (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), जयसिंगपुरा (2), , सिडको एन अकरा (1), नेहरू नगर, कटकट गेट (1), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर, नक्षत्रवाडी (1), भाग्य नगर (4), शिवाजी नगर (1), पदमपुरा (1), उत्तम नगर (2), खोकडपुरा (2), टिळक नगर (1), पिसादेवी (1), बीड बायपास (2), सखी नगर (3), जिल्हा परिषद परिसर (1), सारा गौरव बजाज नगर (3), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (6), पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (3), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (1), दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (1), देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (2), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), मांडकी (1), पळशी (5), जय हिंद नगरी, पिसादेवी (1), कन्नड (1), मातोश्री नगर, औरंगाबाद (1) या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये 47 स्त्री व 55 पुरुष आहेत.

आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या झालेल्या मृत्यू पैकी औरंगाबादचा घाटीत 131 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 47 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकूण 179 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.