औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ,औरंगाबाद

1 min read

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ,औरंगाबाद

मुंबई : औरंगाबाद (चिकलठाणा) य़ेथील विमानतळाचे नाव बदलून ते छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद, असे करण्याची गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत घोषणा केली. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने या बाबतचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. तसेच औरंगाबाद महापालिकेनेदेखील धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ, असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली असून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्रीय नागरी उड्डान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल.