औरंगाबादच्या खासदाराकडून कोरोनाला आमंत्रण?

1 min read

औरंगाबादच्या खासदाराकडून कोरोनाला आमंत्रण?

इम्तियाज जलील यांना कोरोना परिस्थितीच गांभीर्य आहे का?

स्वप्नील कुमावत/औरंगाबादः औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहराचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कडून जनतेला सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क आणि इतर काळजी घेणं आवश्यक आहे. असे खासदार लोकांना सांगतात पण त्यांच्याकडूनच या नियमांचे उल्लंघन झालेले दिसत आहे. यामुळे जलील यांना कोरोना परिस्थितीचा गांभीर्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एका कार्यक्रमाचे इम्तियाज जलील यांचे सोशल मिडीयावर काही फोटो व्हायरल झाले आहे. याफोटोमध्ये सामाजिक अंतर, मास्क वापरणे अशा नियामांचे पालन झालेचे दिसत नाही.

एका कार्यक्रमात जलील गेले असता . तेव्हा कोणाच्याही तोंडाला मास्क लावलेला नव्हता, सामाजिक अंतर देखील दिसुन आले नाही.
एका सार्वजनिक ठिकाणी काही लोकांना सोबत बसलेल्या आहे. त्यावेळा त्यांच्या तोंडाला मास्क नाही. त्यांच्या सोबत बसलेल्या नागरिकांच्या तोंडाला देखील मास्क नाही.
जलील यांच्या कडून गरजूंना अन्नाची पॉकिटे दिली जात आहेत ज्या ठिकाणी ही पॉकिटे भरली जातात. त्या ठिकाणी काम करणारे लोक विनामास्कच हे काम करताना दिसत आहेत.

लोकप्रतिनीधीच नियमांचे पालन करत नसेल तर करायचे काय?