औरंगाबाद मध्ये आज 72 कोरोनाग्रस्तांची वाढ, सारीचे 500 हून अधिक रुग्ण

1 min read

औरंगाबाद मध्ये आज 72 कोरोनाग्रस्तांची वाढ, सारीचे 500 हून अधिक रुग्ण

एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या 2141 तर 108 रूग्णांचा मृत्यू

स्वप्नील कुमावत/औरंगाबाद: जिल्ह्यात आज सकाळी 72 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकुण कोरोनाबाधितांची संख्या 2141 झाली आहे. यापैकी 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन 108 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सध्या 780 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. रविवारी सारी या आजाराचे 23 रुग्ण आढळले यापैकी 9 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
आज सापडलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये 26 महिला आणि 46 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यत सारीच्या 500 हुन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 97 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोरील चिंता आणखी वाढली आहे. सारीच्या आजाराची लक्षणे ही कोरोनासारखीच असल्याने प्रत्येक रुग्णाचेही स्वॅब घेतले जात आहेत. मागील आठवड्यात 50 सारीबाधितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.