औरंगाबादमध्ये पोलिसांच्या हाताला झटका देऊन कैदी पळाला.

1 min read

औरंगाबादमध्ये पोलिसांच्या हाताला झटका देऊन कैदी पळाला.

अटकेत असलेल्या कैद्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. त्याने पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळ काढला.

औरंगाबादः घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कैद्याने पोलिसाच्या हाताला झटका देऊन दि 19 जून रोजी सकाळी पळ काढला. आरोपी इमरान बेग आमेर बेग (25 वर्ष, रा. काबरानगर, गारखेडा परिसर) असे फरार कैद्यांचे नाव आहे. पळून गेलेल्या कैद्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोपीने 16 मार्च रोजी संग्रामनगर रेल्वे रुळाजवळ अक्षय प्रधान याचा आरोपी इमरान आणि सोहेर शेख यांनी धारदार शस्त्राने खून केला होता. या गुंह्यात 16 मार्च रोजी गुन्हेशाखेने आरोपीला अटक केली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये होता. घाटीत उपचारासाठी इमरानला दाखल केले होते. त्याने तेथून पळ काढल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहे. यापुर्वी औरंगाबादच्या कोविड-19 रुग्णालयातून दोन कैदी पळून गेले होते.

येरवाडा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. फिजिकल डिस्टंसिंगसाठी पुण्यात एका खाजगी इमारतीमध्ये तात्पुरते कारागृह उभारण्यात आले होते. या कारागृहातुन 13 जून रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास येथून दोन कैदी बाथरूमच्या खिडकीतून बाहेर उडी टाकत पळ काढला होता.

औरंगाबाद येथील दि 8 जून रोजी दोन कैदी कोविड-19 रुग्णालयातून पळून गेले होते. शोध घेतल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. राज्यातील कोरोनाच्या संकटात कैदी पलायन करत आहेत. त्यांच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम नाही का असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.