औरंगाबादचे केष्टोदा गेले

1 min read

औरंगाबादचे केष्टोदा गेले

मराठी माणुस पण नाव बंगाली.. शिक्षण विदेशात गलेलठ्ट पगाराची नौकरी सोडून आपलं आयुष्य देशसेवेत झाकून दिले. बौध्द आणि हिंदू धर्मातील समन्वयाचे काम केले. याच केष्टोदांना अखेरचा निरोप

केष्टोदा गेले...

औरंगाबादचे केष्टोदा म्हणजे बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब नाईक. वयाच्या ७९ व्या वर्षी उत्तरप्रदेशातील गोरखपूर याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिपावलीच्या पर्वानंतर एक त्यागज्योती निमाली.

बाळकृष्ण नाईक औरंगाबादकर मंडळीसाठी खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील व्यक्तीसाठी अभिमानास्पद नाव आणि एक त्यागमूर्ती. त्यांनी आपले आयुष्य संघकार्यात समर्पीत केले. त्यांच्या कामाविषयी जाणून घेण्याआधी त्यांचे शिक्षण जाणून घेऊ.
IMG-20201119-WA0010

त्यांचो शालेयशिक्षण सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झाले. पदवीपूर्व शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात आणि फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे झाले.
पुढील शिक्षणासाठी गुजरातेतील मोरवी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बाळासाहेबांनी प्रवेश घेतला. त्या संस्थेतून बी ई मेकॅनिकल पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली. त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी बाळासाहेब अमेरिकेत गेले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बाळासाहेबांनी एम एस ही पदवी १९६३ साली घेतली. एमएस चा १५ महिन्याचा अभ्यासक्रम त्यांनी ११ महिन्यातच पूर्ण केला. शिक्षणानंतर तीन वर्ष बाळासाहेबांनी अमेरिकेतील संशोधन संस्थेत संशोधक अभियंता म्हणून काम केले.
हे सगळे चालू असताना बाळासाहेबांचा अंतर्मनातील अध्यात्मिक व देशसेवेचा स्वभाव त्यांना गप्प बसू देत नव्हता. म्हणून बाळासाहेब त्या काळात असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून संघाचे शिक्षण घेण्यासाठी थेट नागपुरात पोहोचले. शिक्षण घेऊन 1966 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून जाण्याचे बाळासाहेबांनी निश्चित केले. त्यांची प्रथम नियुक्ती परभणी येथे प्रचारक म्हणून झाली.
IMG-20201119-WA0005
बाळासाहेबांचे अंगभूत गुण व संघटन कौशल्याचा विचार करून त्यानंतर बाळासाहेबांना बंगाल मध्ये संघ कामासाठी पाठवण्यात आले. १९६७ पासून बाळासाहेबांनी बंगाल
प्रांतात आपल्या कामाला सुरुवात केली. अल्पावधीतच बंगाल मध्ये ते केस्तोदा (बाळकृष्ण) म्हणून सर्वपरिचित झाले. बंगालच्या तेवीस वर्षांच्या कालावधीत बाळासाहेबांनी बंगालमधील गोरगरीब ,वनवासी अशा सर्व क्षेत्रात संघशाखांचे जाळे विणले. अनेक कार्यकर्त्यांना संघ कामात जोडले.
IMG-20201119-WA0010-1

तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा बाळासाहेबांवर प्रभाव होता. ते बौद्ध तत्वज्ञानाचेवर्षांची , अभ्यासक होते. यामुळेच बाळासाहेबांनी समन्वय मंच नावाचा एक मंच स्थापन केला. या मंचाच्या कामासाठी बाळासाहेबांचे स्नेही व मार्गदर्शक भदंत ज्ञानजगतजी महाथेरो वाराणसी यांच्यासोबत जगातील जवळपास २५ देशांत बाळासाहेबांनी अथक प्रवास केला. समन्वय मंचाच्या माध्यमातून याच भूमीतील बौद्ध विचारांचा योग्य प्रसार करण्यासाठी बाळासाहेबांनी एक विशेष बौद्ध प्रदर्शनी तयार करून घेतली होती. अनेक संत महंत, बौद्ध भिक्खू महाथेरो यांच्याबरोबर बाळासाहेब या विषयाची चर्चा करीत असत. विपश्यना साधनेचे मोठे प्रचारक असलेले श्री सत्यनारायणजी गोयंका यांच्याशी श्री बाळासाहेबांचा विशेष स्नेह होता. श्री रामकृष्ण मिशनशीही ते संलग्न होते. हे कार्य बाळासाहेबांनी त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत केले. विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेले बाळासाहेब विवेकानंदांच्या जन्मभूमीत कार्यरत असताना त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या कामाचे दायीत्व आले. त्यांनी १९९५ पासून विश्वहिंदू परिषदेच्या विदेश विभागाचे अनेक वर्षे काम केले. ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष, विदेश विभागाचे संघटन मंत्री म्हणून अनेक वर्ष होते. बाळासाहेबांच्या अथक परिश्रमातून सुरू झालेल्या समन्वय मंचाच्या कामाचे सुपरिणाम दिसायला प्रारंभ झाला होता. बौद्ध तत्वज्ञानातील चिंतनशील व्यक्ती संघ कामाशी जोडल्या गेल्या.

विश्व हिंदू परिषदेचे काम करत असताना अयोध्येतील राम मंदिर आपल्या हयातीत पूर्ण व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभा पासून ते अयोध्येत लक्षदीप लावेपर्यंत बाळासाहेब अयोध्येतच होते. गौतम बुद्धांच्या तत्त्वाचे अध्ययन व पालन करून हिंदू - बौद्ध समन्वय साधत आयुष्यभर त्यासाठी कार्यरत असलेल्या बाळासाहेबांनी आपला अंतिम श्वासही तथागत भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण ज्या कुशिनगर मध्ये झाले त्याच परिसरातील गोरखपूर, उत्तर प्रदेश येथेच घ्यावा हा त्यांच्या आयुष्यातील एक मोठाच योगायोग म्हणावा लागेल.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता विवेकानंदपुरम एन 4 सिडको संभाजीनगर येथून निघून सेंट्रल नाका एन 6 सिडको संभाजीनगर येथील स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होतील.