औरंगाबाद कर नाही सुधारणार

1 min read

औरंगाबाद कर नाही सुधारणार

लॉकडाऊन करून काही फायदा झाला का ?

स्वप्नील कुमावत /औरंगाबाद: औरंगाबाद शहरात १० जुलै ते १८ जुलै या कालावधीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले पण लॉकडाऊन मुळे सर्व काही बंद असताना शहरात भाजी विक्री चालू आहे. शहरातील विविध भागात फेरीवाले आपला गाडा घेवून घरोघरी जावून भाजी विकण्याचे काम नियमितपणे करत आहेत . शहरातील पोलीस व प्रशासनाचा भाजी विक्रेत्यांवर कोणतेही नियंत्रण नाही का? .शहरातील नागरिक पण येणारा भाजीपाला खरेदी करत आहेत. यावेळी काही नागरिक मास्क न लावता खरेदी करत असल्याच दिसत आहे . यामुळे लॉक डाऊन कोणासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत नगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद येथे रोज सकाळी ९ वाजेचा सुमारास भाजीवाले येतात. गल्लीतील सर्वजण भाजी घेतात. विनामास्क भाजी विकणाऱ्या या भाजी विक्रेत्याला कोणतीही नियम लागू नाहीत का ? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत .IMG_20200717_173835

शहर लॉकडाऊन करून काही फायदा झाला नाही. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तची संख्या वाढतच आहे. शहरात अनुक्रमे १४,१६ जुलै या दिवशी शहरात आता पर्यतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत .तरी देखील प्रशासनाचे निष्काळजी पण समोर येत आहे.

लॉकडाऊन करून काही फायदा झाला का?

औरंगाबाद शहरात १० जुलै ते १८ जुलै या कालावधीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले . या लॉकडाऊन काळात कोरोना रुग्ण संख्या कमी नाही झाली तर उलटी वाढली.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे औरंगाबादकरांना त्रास

५ टक्के निष्काळजी लोकांमुळे ९५ टक्के औरंगाबादकरांना लॉकडाऊनचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लॉकडाऊन चे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी.

हुक्का मार के चला हु मै ये मेरी जिंदगी है !