अवैध व्यवसायच्या विरोधात मुटकुळे यांचा इशारा

जिल्हाभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

अवैध व्यवसायच्या विरोधात मुटकुळे यांचा इशारा

हिंगोली: जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक, मटका, अवैध गुटखा विक्री यासारखे अनेक व्यवसाय बोकाळले असल्यामुळे नागरिकांचे आयुष्य देशोधडीला लागत आहे. त्यामुळे हे धंदे तात्काळ बंद करावेत अन्यथा संपूर्ण जिल्हाभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद वाढला आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची देखील वाट लागत आहे. शिवाय ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक गावात खुलेआम मटका सुरू असून याचे स्थानिक पोलिसांशी लागेबांधे आहेत. राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा देखील खुलेआम मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक व तरुण वर्गावर याचा विशेष परिणाम होत आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांशी भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय तात्काळ बंद न केल्यास संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.