अविद्या

1 min read

अविद्या

एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला बदफैली सिद्ध करू पाहत आहे. ते देखील केवळ तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून. अन्य राजकीय व्यक्तींनी स्त्री विषयक अनुद्गार काढले तर टीव्हीवर तासनतास भांडणाऱ्या विद्या बाई आता मात्र सरेआम आपल्याच सुनेच्या इज्जतीचे वाभाडे काढत आहेत

अविद्या
म्हणे सुनेचे अफेअर....

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर कौटुंबिक अत्याचार या कारणावरून मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. 'मुलगाच हवा' (मुलगी नको) या कारणावरून सासू आपला छळ करत असल्याची तक्रार विद्याताई च्या सुनेने केली आहे.

विद्याताई ज्या नेहमीच महिला सन्मान या विषयावर बोलतात पण आज त्या चक्क सुनेचे चारित्र्यहनन करू लागल्या आहेत. एक स्त्री नेता असताना वेगळे बोलते आणि सासू म्हणून वेगळी असते हे विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

सुनेनं तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार देताच 'तिचे विवाहबाह्य संबंध आहेत' आणि तेही अनेक पुरुषांच्या सोबत. असा सरळ आरोप करताना विद्या चव्हाण यांना काहीच वाटले नसावे का? एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला बदफैली सिद्ध करू पाहत आहे. ते देखील केवळ तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून. अन्य राजकीय व्यक्तींनी स्त्री विषयक अनुद्गार काढले तर टीव्हीवर तासनतास भांडणाऱ्या विद्या बाई आता मात्र सरेआम आपल्याच सुनेच्या इज्जतीचे वाभाडे काढत आहेत ही विकृतीच म्हणावी लागेल.
विद्या ताई या वादातून पळवाट तरी किती विचित्र पद्धतीने काढत आहेत बघा. त्या माध्यमातून म्हणतात 'नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढतात' जो नवरा आहे तो तुमचा मुलगा आहे. आणि जी बायको आहे ना ती तुमचे सामाजिक अस्तित्व, पत आणि स्थान बघून तुमची सून म्हणून घरात आली आहे. तिला कुटुंब म्हणून विद्याबाई कडून देखील काही अपेक्षा आहेत. एक स्त्री म्हणून तिची बाजू देखील ऐकावी असे तिला वाटत असेल तर ते चूक कसे असेल. आणि नेहमीच या विद्याजी स्त्रीविषयक प्रश्नावर पोटतिडक दाखवत बोलताना दिसतात.
राम कदम, लोणीकर अशा मुद्द्यावर त्या भांडतात अक्षरशः वाभाडे काढतात मग घरातच त्या इतक्या क्रूर कशा असू शकतात? असे त्या सुनेला वाटणे स्वाभाविक आहे. ओळख नसलेल्या स्त्री विषयी सहानुभूती दाखविणारी स्त्री आपल्याच लेकीच्या आणि सुनेच्या भांडणात मला ओढतात असे जेंव्हा म्हणते तेंव्हा ती आपल्या कुटुंब व्यवस्थेवर घाला घालत असते.आणि विद्या चव्हाण या अशाच स्वरूपात कुटूंब व्यवस्थेची हत्या करत आहेत.
या महनीय नेत्या कधी काय बोलल्या आणि आज काय बोलत आहेत ते एकदा बघा म्हणजे आपल्या सगळे लक्षात येईल. राम गोपाल वर्मा यांनी महिला दिनी जे वक्तव्य केले त्यावर विद्या चव्हाण यांनी राम गोपाल वर्माची चांगलीच हजेरी घेतली होती. राष्ट्रवादीचे अधिकृत व्टिट येथे देत आहे.
vidya-twit
लोणीकर यांनी महिला तहसिलदारला नायिका म्हटल म्हणून विद्या चव्हाण यांना हा समस्त महिला वर्गाचा अवमान वाटला होता. त्यांनी लोणीकरांना माज वा मस्ती अशी शब्द वापरली होती. आता चक्क त्या स्वतःच्या सुनेलाच बदफैली म्हणत आहेत. आता चव्हाण ताईंना ही मस्ती वा माज नाही का
हा वाद त्यांच्या कुटूंबातील आहे. पण सुनेचा छळ करणे, मुलगा व्हावा यासाठी हट्ट धरणे, सुनेला बदफैली म्हणणे हे कोणत्याही सुसंकृत परिवारात घडत नसते. पण विद्या चव्हाण यांच्या परीवारात हे घडले आहे. दुस-यावर आगपाखड करणारा स्वतःच निट नसेल तर ही चर्चा तर घडणारच.....