खाजगीकरणाच्या विरोधात जनजागरण; कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीयीकृत बँकांच्या रक्षणाची शपथ

1 min read

खाजगीकरणाच्या विरोधात जनजागरण; कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीयीकृत बँकांच्या रक्षणाची शपथ

सध्या महाबँकेच्या खाजगीकरणाची चर्चा सुरू असून या बँका सार्वजनिक सरकारी स्वरूपाच्या असाव्यात यासाठी बँक कर्मचारी अधिकारी संघटनेच्यावतीने दिनांक १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जनजागरण अभियान राबवले जात आहे.

सध्या महाबँकेच्या खाजगीकरणाची चर्चा सुरू असून या बँका सार्वजनिक सरकारी स्वरूपाच्या असाव्यात यासाठी बँक कर्मचारी अधिकारी संघटनेच्यावतीने दिनांक १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जनजागरण अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत रविवारी राष्ट्रीय अभिमान असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या रक्षणाची तसेच खाजगीकरण विरोधात जनजागृती करण्याची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.
महाबँकेचे खाजगीकरण होणार असल्याची चर्चा प्रसार माध्यमातून होत आहे. या माध्यमातून जनमत आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या बँका सार्वजनिक सरकारी स्वरूपाच्या असणे गरजेचे आहे. त्यासाठी एआयबीईए व एआयबीओए बँक कर्मचारी अधिकारी संघटनांच्या वतीने व्यापक जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

लातूरसह देशभरातील साठपेक्षा अधिक शहरात रविवारी शपथग्रहण सोहळा घेण्यात आला. लातूर येथे ज्येष्ठ कर्मचारी कॉ. धनंजय कुलकर्णी व सर्वात नव्या कर्मचारी माधुरी आंबेकर यांनी सर्वांना शपथ दिली. केंद्र सरकारने खाजगीकरण केले तर संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा धनंजय कुलकर्णी व माधुरी आंबेकर यांनी यावेळी बोलताना दिला. या यावेळी कॉम्रेड धामणगावकर, उमाकांत कामशेट्टी, अश्विनी सावंत, बडगिरे, महेश गांधले, रोहन खरात यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.