कोरोनाबाधीत रुग्णांसाठी जनजागृती आवश्यक

कोरोना रुग्ण शेतात पळून गेल्याने त्यांना पकडून आणण्यासाठी पोलीस पथकाला धावपळ करावी लागल

कोरोनाबाधीत रुग्णांसाठी जनजागृती आवश्यक

परभणीः गेल्या काही दिवसात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर परभणी शहरासह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात आढळून येत असलेले कोरोना रुग्ण उपचारासाठी हयगय करत आहेत. तर यासाठी प्रशासनातील कर्मचार्‍यांना धावपळ करावी लागत आहे.

गुरुवारी जिल्ह्यात सर्वोच्च कोरोना रुग्ण आढळून आले. तालुक्यातील आर्वी गावातही एकाच दिवशी २० रुग्ण सापडले होते. गुरुवारी या गावात आणखी काही रुग्ण आढळून आले. परंतु या रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. ही बाब समजल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक गावात दाखल झाले. मात्र हे रुग्ण इतरत्र पळून जात असल्याची स्थिती पहायला मिळाली. पोलिसांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकार्‍यांना ही बाब सांगीतल्यानंतर तेही गावात तत्काळ दाखल झाले. त्यांनी कोरोनाबाधितांची समजूत काढली. तरीही हे रुग्ण दवाखान्यात जाण्यासाठी विरोध करत होते.

रुग्ण शेतात पळून गेल्याने त्यांना पकडून आणण्यासाठी पोलीस पथकाला धावपळ करावी लागली. यातील काही जणांना समजूत घालून दवाखान्यात दाखल केले तर काहींना शुक्रवारी उशिरा उपचासाठी दवाखान्यात आणण्यात आल्याची माहिती आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.