आयोध्या: राममंदिर बांधकामाच्या भूमिपूजनाची तारीख अखेर ठरली.

1 min read

आयोध्या: राममंदिर बांधकामाच्या भूमिपूजनाची तारीख अखेर ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

आयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर झाली. शनिवारी, श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत भूमिपूजनासाठी 3 किंवा 5 ऑगस्ट अशी तारीख निश्चित करण्यात आली असून ते पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. आता राम मंदिराचे भूमिपूजन कोणत्या तारखेला करावे, याचा अंतिम निर्णय पीएमओ ने घेतला असून 5 ऑगस्ट ही तारीख निश्चीत करण्यात आली आहे.
ram-mandir
यासह मंदिराची प्रस्तावित नकाशा व उंचीही बदलण्यात आली आहे. आता राम मंदिरात तीन ऐवजी पाच घुमट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिर प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्याच्या बांधकामाविषयी शंका निर्माण झाली होती. परंतु शनिवारी अयोध्येत श्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या बैठकीत त्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.