निलंगा/माधव पिटले: तालुक्यातील अंबुलगा बु येथील एका दिव्यांग व्यक्तीच्या मुलीच्या लग्नाला जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी आर्थिक मदत करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
अंबुलगा बु येथील नागनाथ स्वामी यांचे दोन्ही पाय एका अपघातात गेले. आणि चार मुलींचे पालन पोषण व शिक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली. त्या आजही गावात मोलमजुरी करून कुटुंबियांचे पालन करतात. अत्यंत हालाकिची परिस्थितीत जीवन जगणाऱ्या स्वामी कुटुंबाला व त्यांच्या मुलीच्या लग्नाला सढळ हाताने मदत करावी. हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन जि.प.परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी लग्न कार्याला मदतीचा हात दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाप दिव्यांग; मुलीच्या लग्नाला जि.प.उपाध्यक्षांचा आधार
जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके यांचा स्वामी कुटुंबाला मदतीचा हात

Loading...