बाटग्याची भांग(बांग)

शिवसेना भवन म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असल्याने हल्ला झाला तर आम्ही काय करु हे अनेकांनी सांगितलं. संजय राऊत आणि अगदी मुख्यमंत्र्यांनीही त्यावर भाष्य केलं आणि सगळेच जण चवताळून उठले. त्यात राऊतांनी बाटग्यांचा विषय काढला, भाजपच्या मुळ नेत्यांपेक्षा बाटगेच अधिक आक्रमक झालेत असा दावा राऊतांनी केला.

बाटग्याची भांग(बांग)

महाराष्ट्रः 'बाट' हा शब्द बहुतेक वेळा धर्मांतरीत मुस्लिम किंवा ख्रिश्चनांसाठी वापरला जातो. अशी बाटगी माणसं आपली धर्म निष्ठा दाखवण्यासाठी त्वेषाने अनेक गोष्टी करत असतात. जे नसतं ते दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न असतो. राजकारणात याच बाट, भांग आणि बांगेवरुन जोरदार चर्चा चालू आहे. महाराष्ट्राचं राजकारण या बाटग्यांच्या विषयामुळे ढवळुन निघालं आहे. मुंबईमध्ये शिवसेनेच्या विरोधात भाजपची मंडळी बोलू लागली, या भवनावर हल्ला करु असं भाजपने म्हटलं नव्हतं परंतु शिवसेना भवन म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असल्याने हल्ला झाला तर आम्ही काय करु हे अनेकांनी सांगितलं. संजय राऊत आणि अगदी मुख्यमंत्र्यांनीही त्यावर भाष्य केलं आणि सगळेच जण चवताळून उठले. त्यात राऊतांनी बाटग्यांचा विषय काढला, भाजपच्या मुळ नेत्यांपेक्षा बाटगेच अधिक आक्रमक झालेत असा दावा राऊतांनी केला.

भाजपमध्ये नवीन आलेल्या लोकांना राऊत बाटगे असं संबोधत होते. भाजपच्या मंडळींना राऊतांनी बाटगे म्हंटल्यावर त्यांच्याकडुनही उत्तर येणं स्वाभाविक होतं आणि त्यानंतर नारायण राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणेंनी शिवसेनेतल्या बाटग्यांची यादी सांगायला सुरुवात केली. ती मंत्रीपदांची यादी आपणही अनेकवेळा सांगितली आहे. शिवसेनेला किती वेळा मंत्रिपदं मिळाली याचा विचार करणंही आवश्यक आहे. खरंतर मंत्रीमंडळात शिवसैनिक कमी आणि बाटग्यांचीच(इतर पक्षातुन शिवसेनेत आलेले) संख्या जास्त आहे. राज्यसभेच्या बाबतीतही प्रियंका चतर्वेदी, संजय निरुपम यांसारख्या लोकांना पदं दिली जातात. शिवसेनेने राज्यसभेसाठी विशेषतः उत्तर भारतातुन आलेल्या अमराठी लोकांनाच प्राधान्य दिलेलं आहे. आताची मंत्रीपदंही बाटग्यांनाच दिली गेली आहेत, हे नितेश राणे यांनी जाहिर करुन टाकलं आणि मग बाटग्यांवर कोण जास्त कृपा करतो यावर चर्चा चालू झाली.

खरंतर राजकारणात अशा बाटग्यांनाच जास्त महत्त्व दिलं जातं. जो मुळ पक्षातला आहे त्याच्याकडे सतरंजी उचलणे, सभागृह साफ करणे, हाराची यादी करणे किंवा स्पिकर लावणे यासारखी कामं दिली जातात. मात्र इतर पक्षातून येणारी माणसं आरामात मोठमोठी पदं मिळवत असतात. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच उदाहरण पहा, ते युती सरकारच्या काळातही मंत्री होते, आघाडी सरकारच्या काळातही मंत्री होते, दुर्देवाने ते पराभूत झाले आणि मंत्रीपद गेलं अन्यथा त्यांच मंत्रीपद कायम राहिलं आहे. अनिल देशमुखही १९९५ ते १९९९ युती सरकारच्या काळात मंत्री होते आणि आता आघाडीच्या सरकारमध्येही मंत्री आहेत. ही बाटग्यांची जमात गावभर चरत असते आणि सगळीकडून आपापली पदं घेत असते.

आताचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे सेना, मनसे असा प्रवास करत भाजपमध्ये आले आहेत. शिवसेनेत जयदत्त क्षिरसागरांनाही मंत्रीपद दिलं गेलं होतं ते राष्ट्रवादीमधुन आले होते. अगदी भाजपमध्येही नव्याने आलेल्या अनेकांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. ही सगळी बाहेरुन आलेली मंडळी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी जोरदार बांग देत असतात. ही बांग देता यावी म्हणून भांग खाल्यासारखी ही मंडळी बोलत असतात. मुंबई महानगरपालिकेची निवडणुक जवळ आली म्हणुन प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे ही सगळी मंडळी आक्रमक झालेली दिसतात. याच आक्रमक झालेल्या लोकांना राऊत बाटग्यांचा कलकलाट असं म्हणतात.

पण बाटग्यांच्या यादीत शिवसेना सध्या अव्वल क्रमांकावर जाते आहे. म्हणजे उत्तर भारतीयांना पदं देणं ते आता मुस्लिमांना पदं देण्यापर्यंत शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. शिवसेना बाटग्यांना महत्त्व देते आहे असं म्हणण्यापेक्षा शिवसेना आता बाटग्यांची झाली आहे असंच दिसतं आहे. राजकारणात बाटग्यांना महत्त्व दिल्याशिवाय सत्तेत मोठं होता येत नाही, हे सुत्र आहे आणि हे सुत्र शिवसेना अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळते आहे. फक्त शिवसेनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही अनेक बाहेरच्या लोकांना महत्त्व दिलं आहे. पदासाठीच असे अनेक लोक काम करत असतात आणि अशी खुप मोठी यादी आपल्याला सांगता येईल. काही पक्ष वेगळी भुमिका घेतील असं लोकांना वाटत असतं मात्र तसं काही होताना दिसत नाही. त्यामुळेच बाटगे, भांग खाऊन बोलणं अशा विषयांवर कोणीच न बोललेलं जास्त बरं राहील.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.