गणपती विर्सजन करताना तरुणाचा बडुन मुत्यू

साकोळच्या तरूणाचा मोहळ येथील सिना नदीत बुडाल्याने मृत्यू

गणपती विर्सजन करताना तरुणाचा बडुन मुत्यू

लातूर : शिरूर अंनतपाळ तालुक्यातील साकोळ येथील सौरभ सुभाष बेंबळगे हा कामानिमित्त विशाल निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड, कोळेगाव येथे कामाला होता परंतू मौजे कोळेगाव ता.मोहळ येथील सिना नदीवरील कोळेगाव आष्टे बांधा-यावरून दिड दिवसाचा गणपती विसर्जनावेळी वाहून गेला आहे.

सदरील तरुणाचा शोध घेण्यासाठी मोहळ तहसीलदारांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांच्याकडे एका लेखी पत्राव्दावारे केली होती.मोहळ तहसीलदार यांनी लगेचच पत्राव्दारे अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाकडे घटनेचा सविस्तर अहवाल सादर केला व त्यानुसार सदरील घटनेचा शोध चालू झाला.

विशाल निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड, कोळेगाव या कंपनीच्या कर्मचा-यांनी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सिना नदीवरील कोळेगाव आष्टे बांधा-यावर दिनांक ११ रोजी रोजी दुपारी दोन वाजता गेले असता सौरभ सुभाष बेंबळगे वय वर्ष २० रा.साकोळ तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर सध्या राहाणार कोळेगाव तालुका मोहळ हा कंपनीचा कर्मचारी पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.सदरील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचा शोध घेतल्यानंतर मयत अवस्थेत त्याचे प्रेत सापडले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.