जगभरात असे अनेक प्राणी, पक्षी असतात ज्यांच्या मध्ये काहीतरी विशेष असते. यामध्ये एक वैशिष्ट्य असे की काही तर असे असतात जे अनेक दिवस अन्न पाण्याविणा जीवंत राहू शकतात. आज तुम्हाला अशाच एका दुर्मिळ प्राण्याबद्दल सांगणार आहोत जो अनेक वर्ष काही न खाताही जीवंत राहू शकतो. सॅलामॅंडर नाव असलेला हा प्राणी दक्षिण पुर्व युरोपमधील बोस्निया आणि हर्जेगोविना देशातील पाण्यात असणारया गुहांमध्ये आढळला आहे.
सुमारे सात वर्षे ओलांडूनही तो आपल्या जागेवरून अद्याप हललेला नाही. संशोधकांचे असे म्हणने आहे की, याची त्वचा आणि अविकसीत असणारे त्याचे डोळे याळा आंधळे करतात. आणि याच कारणामुळे कदाचित तो आपल्या जागेवरून हलू शकत नसावा. तसे बघितले तर त्याचे आपल्या जागेवरून न हलने ही काही असामान्य बाब असू शकत नाही.
सॅलामॅंडर हे आपले संपुर्ण आयुष्य पाण्यामध्ये जगतो. त्याचे वय १०० वर्षे असते. यांचा वावर स्लोवेनिया पासून तर क्रोएशिया सारख्या बाल्कन देशातही आहे. तो १२ वर्षा नंतर आपली जागा तेव्हाच बदलतो जेव्हा त्याला एखाद्या जोडीदाराची गरज भासते.
हंगेरियन नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या ज्युडिट व्होरोस यांच्या मते "अशा प्राण्यांची गर्भधारणा होण्यापूर्वी कल्पना करण्यात आली होती. जोरदार पावसामुळे हे प्राणी गुहामधून बाहेर आल्यामुळे त्यांना बघता आले. अन्यथा त्यांना बघण्यासाठी खोदकाम करून गुहांमध्ये प्रवेश करावा लागला असता. हे ज्या गुहांमध्ये राहतात त्या ठिकाणी त्यांना अन्न मिळणे सहज शक्य होत नाही. तसेही ते अन्नाविना अनेक वर्षापर्यंत जीवंत राहू शकतात. ते जेव्हाही सक्षम होतात तेव्हा ते लहान मोठ्या किंड्याचे सेवन करतात.
बघितल्यावर वाटते पाल, परंतु प्रत्यक्षात काही वेगळेच
यामध्ये एक वैशिष्ट्य असे की काही तर असे असतात जे अनेक दिवस अन्न पाण्याविणा जीवंत राहू शकतात.

Loading...