बाकीच्या सुशांतचं काय ??

११.६ Million Followers असणा-या सुशांतला आपली वेदना बोलून दाखवायला किंवा मन हलकं करायला एकही जवळची व्यक्ती मिळू नये हे करुणास्पद आहे..

बाकीच्या सुशांतचं काय ??

आज सुशांत सिंग राजपुतच्या "दिल बेचारा" चित्रपटाचा ट्रेलर बघितला😓😓‌‌खरंच खूप उत्तम अभिनेता होता सुशांत.. एकाहून एक सरस असे चित्रपट त्यानं आपल्या अल्प कारकिर्दीत दिले होते.. आपल्याकडे माणूस गेल्यानंतर त्याचं कौतुक होतं असं म्हणतात ते योग्यच आहे..‌‌मीडियासुद्धा कुठल्याही बातमीला जो पर्यंत TRP मिळतो तोवरच प्रकाश झोतात आणते अन नंतर त्याकडे साफ़ दुर्लक्ष करते..‌‌त्याबद्दल काही लिहावंसं वाटलं म्हणून हा शब्दप्रपंच..!!‌‌गेल्या महिन्यात ग्लॅमरस दुनियेतल्या त्या गुणी अभिनेत्याचा नेपोटीझममुळे बळी गेला अन प्रत्येक Channel त्यांनीच घोषित केलेले "विचारवंत" बोलावून आपापल्यासोयीचे मुद्दे घेऊन Bollywood मधल्या नेपोटीझमची विविधांगी चर्चा करु लागले तशी ती अजूनही चालूच आहे..

हे सगळं ठीक, पण या निमित्ताने नेपोटीझम आणि कामासंबंधीचे तणाव, अपयश आणि त्यामुळे येणारं नैराश्य याची किमान चर्चा सुरू झाली हे चांगलं झालं.. नेपोटीझम फक्त Bollywood मध्येच आहे असं नाही.. Bollywood, राजकारण आणि अशी बरीच क्षेत्रं आहेत जिथे परिवारवाद चालतो, दिग्दर्शकाच्या पोटातुन दिग्दर्शक, अभिनेत्याच्या पोटी अभिनेता, नेत्याचा मुलगा नेता, सहकारी संस्थेच्या मालकाचा मुलगा पुढे मालक होतो अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत..

राजकारणात बड्या नेत्यांची मुलं सहजतेने राजकारणात उतरतात "युवा नेते" बनतात तेव्हा तिथं अन्याय होतो वर्षानुवर्ष चटया उचलणार्या आणि स्वत:च्या बापाच्या पैशाने एखाद्या तालुकाध्यक्षाच्या किंवा एखाद्या नगरसेवकाच्या मागे जय हो करत फिरणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर..‌‌तशीच या मुखवटा लावलेल्या खोट्या दुनियेत So Called मोठ्या कलाकारांची "Star Kids" सहज अभिनेते अभिनेत्री बनतात,पटकन मोठ्या Production House चा एखादा चित्रपट मिळवतात, तो Hit होत असेल तर उत्तमच पण होत नसेल तर तो व्यावसायिक गणितं जुळवून Blockbuster केला जातो तेव्हा यात बळी जातो सुशांत सारख्या बाहेरुन येऊन, कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या पण स्वकष्टावर नावलौकिक मिळवण्याची इच्छा बाळगणार्या होतकरू कलावंतांचा..‌‌कपूर खानदान, बच्चन खानदान, सुनिल दत्त नर्गिस दत्त आणि संजय दत्त परिवार, निर्माता दिग्दर्शक बडजात्या परिवार, भट्ट परिवार, दक्षिणेतील चिरंजीवीचं कुटुंब, चोप्रा परिवार अशी अनेक जिवंत उदाहरणं आपल्या समोर आहेत ज्यांनी आपली Credibility वापरून आपल्या मुलांना समोर आणलं..

क्रिकेटच्या बाबतीतही तेच लागू होतं असं दिसतंय.. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कुठल्याही खेळाडूला एका System मधून यावं लागतं..‌‌जिल्हा पातळीवर संघ, विभाग पातळी, राज्य पातळी आणि देश पातळी अशा अनेक प्रकारातून खेळाडू निरखून पारखून कोलश्यातून हिरा शोधावा अशा पद्धतिने निवडले जातात.. पण यालाही अपवाद काही खेळाडू अपवाद ठरले.. Little Master सुनिल गावसकर सारख्या दिग्गज खेळाडूचा पोरगा पटकन क्रिकेटच्या मैदानावर उतरला, स्वत:च्या नावासोबत बापाचं नाव सहज लावता येतं हे जरी खरं असलं तरी तसं कर्तृत्व हे स्वकष्टानंच गाजवावं लागतं..‌‌प्रणव धनावडे नावाच्या गरीब रिक्षाचालकाच्या प्रतिभावान मुलाचा Performance मास्टर ब्लास्टरचा मुलगा अर्जुनपेक्षा सरस असुनही प्रणवला डावलून अर्जुनला Under 16 संघात स्थान सहज दिलं गेलं..कामाचा ताणतणाव, आपली व्यथा, दु:ख यासगळ्या गोष्टी Share करण्यासाठी आपली हक्काची माणसं असावी लागतात, ११.६ Million Followers असणा-या  सुशांतला आपली वेदना बोलून दाखवायला किंवा मन हलकं करायला एकही जवळची व्यक्ती मिळू नये हे करुणास्पद आहे..आज प्रत्येक क्षेत्रातला युवक नैराश्याच्या गर्तेत अडकलाय.. Job Safety, Carrier Issues, Business Problems आणि अशी अनेक कारणे आहेत त्याला दबाव आणि नैराश्याच्या गर्तेत जायला भाग पाडणारी..

कोरोना वैश्विक महामारीमुळे असंख्य बळी जातायत ते आपल्याला आज स्पष्ट दिसतंय पण कोरोनानंतर येणार्या #आर्थिक मंदी, वेतन व नोकरी कपातीच्या महासंकटावर आज जर वेळेपुर्वीच उपाययोजना केल्या तर नैराश्यामुळे आत्महत्येला जवळ करणारे असे अनेक "सुशांत" आपल्याला वाचवता येतील.. केवळ आर्थिक पाठबळ देऊन या गोष्टी थांबणार नाहीत, त्यासाठी वैद्यकीय मदतीची(Medical Counciling) मदत घ्यावी लागेल..‌‌१९९३ च्या किल्लारी भुकंपानंतर स्वत:च अस्तित्त्व,घर परिवार उध्वस्त झालेल्या तिथल्या लोकांनाही अशाच Medical Counciling द्वारे उभं केलं होतं ज्यात मला आवर्जून ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ञ आदरणीय डॉ मोहन आगाशे सर यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करावासा वाटतो..

दैनंदिन आयुष्यात #वैफल्यग्रस्त आणि #अपयशाचे धक्के खाणारे असे असंख्य सुशांत आज प्रत्येक क्षेत्रात होत असलेला अन्याय निमूटपणे सहन करत आहेत त्यातले काही या त्रासाला कंटाळून स्वत:च स्पर्धेच्या बाहेर पडतात तर काही या जगाच्या बाहेर😞‌‌I'm Sorry To Say But That's The Truth 😷

त्यामुळे फक्त Bollywood च्या धेंडांना झापणारी(वरवर) ही Intellectuals इतर क्षेत्रात होत असलेल्या अन्यायावर कधी बोलतील हा एक यक्ष प्रश्न आहे..

शुभं भवतू..!!

  • ✒️ ओम देशमुख

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.