भाजपच्या मराठवाडा व्यापारी आघाडी प्रमुखपदी  मुंदडा यांची निवड.

1 min read

भाजपच्या मराठवाडा व्यापारी आघाडी प्रमुखपदी मुंदडा यांची निवड.

भारतीय जनता पक्षाच्या बांधणीला वेग

सिध्देश्वर गिरी/परभणी: जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या बांधणीने वेग घेतला असून, केंद्रासह मोठ्या राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर ठेवण्यात आले. तेव्हापासून भाजपाचे पदाधिकारी गावपातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत शेतकरी, मजूर, छोटे व्यवसायिक यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत पक्ष बळकट करत आहेत.
mundada-sonpeth
त्यानुसार प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देऊन पक्षाच्या विविध आघाड्याची बांधणी आणि पक्षाची बांधणी आहे. यात नुकतीच व्यापारी आघाडीच्या मराठवाडा प्रमुखपदी सोनपेठचे माजी नगराध्यक्ष बालाप्रसाद मुंदडा यांची निवड पक्षाने केली आहे. मुंदडा यांनी यापूर्वी भाजपच्या जनरल बॉडीचे काम केले असून सामान्य लोकांना अन्नदान, अध्यात्म, रक्तदान शिबिर, वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना कपडे,चादर वाटप सर्व रोगनिदान शिबीर, नेत्ररोगनिदान शिबीर,परळी सोनपेठ,पाथरी या रस्त्याच्या प्रश्नी पाठपुरावा,रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासाठी काम केलेले आहे. मुंदडा यांच्या कामावर प्रभावित होऊन. त्यांना भाजपच्या व्यापारी आघाडीच्या मराठवाडा प्रमुखपदीच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे. या निवडीबद्दल विनोद काकाणी व प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड,किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळंके,जेष्ठ नेते रमाकांत जहागीरदार,जिल्हाउपाध्यक्ष शिवाजी मव्हाळे,ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे,सोनपेठ तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर यांच्यासह आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.