बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक आधार

1 min read

बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक आधार

राष्ट्रीय मिशन अंतर्गत मोफत रोपांचे वाटप

हिंगोली- राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 600 हेक्‍टरवर लागवडीकरिता शेतकऱ्यांना मोफत बांबू रोपांचे वाटप सुरू करण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न साध्य करता येईल असा विश्वास विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 600 हेक्‍टरवर शेतकऱ्यांना लागवडीकरिता टिशू बांबू रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत 400 शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. विशेष बाब म्हणजे तीन वर्षापर्यंत प्रति रोप दीडशे रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना वन विभागाच्या वतीने आर्थिक सहाय्यता देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे वारंवार नुकसान होत असताना साधारण व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत बांबूची केलेली लागवड शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. विविध फळबागा पासून ते इमारत बांधकाम, कागद प्रक्रिया उद्योग याकरिता बांबू ची गरज मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांबू उत्पादनातून आर्थिक उत्पन्न साध्य करु शकतील असा विश्वास वन अधिकारी केशव वाबळे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर आदींची उपस्थिती होती.