परभणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटंनाना येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत प्रशासनाने बंदी घातली आहे. या काळात कुठल्याही पक्ष संघटनेला आंदोलन, निदर्शन, उपोषण किंवा रास्तारोको करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने पून्हा कोरोना संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांवर टाकण्यात आली आहे. कोव्हिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे असे आदेश काढले असून आदेशाचे पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.