स्वप्नीस कुमावत/औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात कंपन्या बंद असल्यातरी देखील उद्योजकांना भरमसाठ विज बिल आल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कारभाराविरोधात उद्योजक कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती वीज नियामक आयोगाचे ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांनी दिली. वाळुज, शेंद्रा, रेल्वेस्टेशन आणि चिकलठाणा एमआयडीसी मिळून सहा कोटी रुपयांचे अतरिक्त वीज बिल आल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन काळात कंपन्या बंद असल्यामुळे वीज बिलवर आकरण्यात येणारा स्थिर कर रद्द करावा, अशी मागणी उद्योजकांकडून करणयात आली होती मात्र झाले उलटेच.
उद्योगाला लागणारी वीज ही केव्हीएचमध्ये मोजण्यात येते. त्यासाठी कंपन्यांमध्ये कपॅसिटर बसवले आहेत. कंपन्या बंद असल्या तरी कपॅसिटर सुरुच होते. त्यामुळे हे वीज बिल आल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
‘लॉकडाउन काळापुरते तरी केव्हीएच आणि केडब्ल्यूएच यात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र, याकडे लक्ष न दिल्याने ही अडचण निर्माण झाली. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून देऊ’
-** हेमंत कापडिया, ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग**
बंद कंपन्या तरीही भरमसाठ विज बिल
बिलवाढीविरोधात उद्योजक न्यायालयात जाणार

Loading...