बंगळुरू हिंसाचार नुकसानीची दंगेखोरांकडून वसूली

1 min read

बंगळुरू हिंसाचार नुकसानीची दंगेखोरांकडून वसूली

बंगळुरू हिंसाचार पूर्वनियोजित

ओम देशमुख/प्रतिनिधी:बंगळुरूमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेली हिंसा ही घडवून आणण्यात आली होती. ती पूर्वनियोजित होती. या हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानीची दंगेखोरांकडून वसूल केली जाईल, असं कर्नाटकचे मंत्री सी टी रवि यांनी म्हटलंय.
काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकानं सोशल मीडियावर टाकलेल्या कथित पोस्टमुळे हिंसक झालेल्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. कर्नाटकचे मंत्री सी.टी. रवि (CT Ravi) यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सायंकाळी बंगळुरूमध्ये उसळलेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, तो घडवून आणला गेला. बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना रवि यांनी भाजप शासित राज्य असलेल्या उत्तर प्रदेशप्रमाणेच कर्नाटक सरकारही हिंसेदरम्यान नष्ट झालेल्या संपत्तीची आणि नुकसानीची वसुली दंगेखोरांकडून करणार असल्याचं सांगितलंय. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं अशाच पद्धतीनं वसुली केली होती.