बॅकांनी घेतला युवासेनेच्या आंदोलनाचा धसका.

1 min read

बॅकांनी घेतला युवासेनेच्या आंदोलनाचा धसका.

खातेदार शेतकऱ्यांना येत्या १० आक्टोंबरपर्यंत कर्जवाटप करणार-बॅक

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: बॅका शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी संकटात होते. ही बाब लक्षात घेता युवासेनेच्या वतीने धरने आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. या धरणे आंदोलनाची धसकी स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या सोनपेठ शाखेने घेऊन करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्याची लेखी विनंती करत. खातेदार शेतकऱ्यांना येत्या १० आक्टोंबरपर्यंत कर्जवाटप करणार असल्याचे सांगितले आहे. यानुसार आज १७ मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी युवासेनेच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी सांगितले.