थकित पैशासाठी बॅंक कर्मचाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी

तक्रार दाखल करुनही पोलीस सहकार्य करीत नसल्याचा महिलेकडून आरोप....

थकित पैशासाठी बॅंक कर्मचाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी

औरंगाबाद : क्रेडिट कार्डच बिल थकलं म्हणून बॅंक कर्मचाऱ्यांनी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे.

औरंगाबाद मधील एका बँंकेनं आपल्या ग्राहकांकडील थकीत कर्ज आणि हफ्ते वसुल करण्याचं काम एका थर्ड पार्टीला दिलं असून औरंगाबादचे रहिवासी सोनी यांच्या पत्नीकडे क्रेडीट कार्ड होते. त्यावर त्यांनी ४६ हजारांची खरेदी केली होती. त्यातील २५ हजार भरले, मात्र कोरोना निर्बंधामुळे धंदा थोडा कमी झाला आणि क्रेडीट कार्ड बिल थकले, त्यामुळं कंपनीकडून वसूलीसाठी फोन यायला लागले. सुरुवातीला कंपनीचे लोक बिल भरायची मागणी करत होते पण नंतर कंपनीचे लोक थेट शिवीगाळ करू लागले, इतकंच नाही तर पैसै भरायला नसतील तर शरीरसंबंधांची मागणी या कंपनीच्या वसूली एजंटने केली.

अखेर वैतागलेल्या सोनी यांनी थेट सिडको एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. एका महिलेला अशी मागणी करणं गुन्हाच मात्र तरी सुद्दा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला, शिवाय तपासाच्या नावाखाली पोलीस फिर्यादी महिलेच्या पतीला दिल्लीला घेऊन गेले, अखेर कंटाळलेल्या सोनी कुटूंबियांनी पोलिस आयुक्त कार्यालय गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आता तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.